बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जोपर्यंत ‘तो’ मंत्री जेलमध्ये जात नाही तोपर्यंत…”, राहुल गांधी आक्रमक

नवी दिल्ली | देशाच्या इतिहासातील सर्वात मोठं शेतकरी आंदोलन आता संपलं आहे. तीन कृषी कायद्यांच्या माघारीशिवाय शेतकरी आपल्या जागेवरून हालले सुद्धा नाहीत. या आंदोलनादरम्यान तब्बल 700 हून अधिक शेतकऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. यामध्ये लखीमपूर येथील केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मुलाच्या गाडीनं चिरडलेल्या शेतकऱ्यांचादेखील समावेश आहे.

लखीमपूर खेरी येथे शांततापुर्ण आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गाडी घातल्यानं 4 शेतकऱ्यांसह एका पत्रकाराचा मृत्यू झाला होता. या घटनेसाठी एसआयटीनं आशिष मिश्राला हेतूपुरस्पर घटना घडवून आणल्याचं आपल्या अहवालात म्हटलं आहे. परिणामी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्यासाठी मोदी सरकारवर दबाव वाढत आहे. काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी राजीनाम्यावर आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना असं म्हटलं की, शेवटी मंत्र्याला राजीनामा द्यावाच लागेल कारण आम्ही हा मुद्दा सोडणार नाही. जोपर्यंत तो मंत्री जेलमध्ये जात नाही, तोपर्यंत आम्ही त्याला सोडणार नाही. मग भलेही 5, 10 किंवा 15 वर्ष लागुद्या, आम्ही त्या मंत्र्याला सोडणार नाही, असा स्पष्ट इशारा राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

दरम्यान, अजय मिश्रा यांचा राजीनामा घेण्यात यावा यासाठी केंद्र सरकावर दबाव वाढत असतानाच आता मिश्रा यांचा पत्रकारांना दमदाटी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. परिणामी विरोधी पक्षांचा दबाव आणि एसआयटीचा अहवाल यांचा परिणाम म्हणून मिश्रा यांचा राजीनामा येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

थोडक्यात बातम्या 

‘ती’ वाईट बातमी आली अन् राजनाथ सिंहांनी भाषण थांबवलं

पोर्नोग्राफी केस: अश्लील व्हिडीओ प्रकरणी राज कुंद्राला न्यायालयाचा मोठा दिलासा

83च्या ‘त्या’ मिस्ट्री बाॅलची कहाणी 38 वर्षांनंतरही उलघडली नाही; पाहा व्हिडीओ

“शकुनी काकांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या सरकारकडून आरक्षण मिळणार नाही”

OBC Reservation: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली मंत्रिमंडळाची बैठक; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More