रायगडावर पावसाचं रौद्ररुप, पर्यटकांची उडाली तारांबळ; पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO

Raigad heavy rain | राज्यभरात सध्या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईमध्ये तर पावसाने थैमान घातलं आहे. मुंबईतील बऱ्याच भागात रस्त्यांना नदीचे स्वरूप आल्याचं दिसून आलं. मुंबईकरांची लाईफलाइन असणारी लोकल देखील पावसाने ठप्प झाली. नागरिकांना यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. दुसरीकडे, रायगडमध्ये देखील जोरदार पाऊस बरसला.

रायगड जिल्ह्यात काल दुपारी साडेतीन ते चार वाजेपर्यंत मुसळधार (Raigad heavy rain ) पाऊस पडला. काल रविवार असल्याने पर्यटक छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर गेले होते. मात्र, येथे मुसळधार पाऊस पडल्याने पर्यटकांची फारच तारांबळ उडाली.

रायगडावर अडकलेल्या पर्यटकांचा व्हिडिओ समोर

जोरदार पडणाऱ्या पावसात गडाच्या पायऱ्यांवर (Raigad heavy rain ) हे पर्यटक अडकले होते. यावेळी मुसळधार पावसामुळे रायगड किल्ल्याच्या पायऱ्यांवरून पाणी जोरात वाहत असल्याचे दिसून आले. पायऱ्यांवरून वाहणाऱ्या पाण्यामध्ये पर्यटक स्वतःचा बचाव करताना दिसून आले.

रायगडमधील एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. व्हिडीओमध्ये किल्ल्याच्या पायऱ्यांवरून जोरदार ओढ्यात पाणी उतरताना दिसत आहे. दरम्यान, अनेक पर्यटक पायऱ्यांवर अडकले होते. कसे तरी पर्यटक साइडला बांधलेल्या भिंतीच्या साहाय्याने स्वत:ला सांभाळताना दिसत होते.

मुंबईत पावसाचे थैमान

हा व्हिडिओ बघून येथे पडलेल्या पावसाचा अंदाज दिसून येतोय. पावसाळ्यात पर्यटक मोठ्या संख्येने गड, किल्ले अशा ठिकाणी फिरण्यासाठी जात असतात. मात्र, अचानक कधी पावसाचा जोर वाढेल, सांगता येत नाही. बऱ्याच ठिकाणी काही जणांनी आपला जीव देखील गमवला आहे. त्यामुळे बाहेर जाताना योग्य ती खबरदारी घेऊनच बाहेर पडायला हवे.

मायानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत (Raigad heavy rain ) देखील पावसाने बरंच नुकसान केलं आहे. मुंबईत पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. हवामान खात्याने मुंबईला अजून 24 तास भरती-ओहोटीचा इशारा दिलाय.

News Title –  Raigad heavy rain  

महत्वाच्या बातम्या-

“रिचार्जचे पैसे जस्टिन बिबरच्या खिशात”; अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्यावर प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट

“धनदांडग्याची मुले असो किंवा राजकारण्यांची..”; ‘हिट अँड रन’ प्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं वक्तव्य

मुंबईच्या पावसाचा मंत्र्यांनाही फटका; ‘या’ नेत्यांनी रेल्वे रूळावरून केला चालत प्रवास

“..तेव्हा तुमचे बाप-दादा इंग्रजांचे तळवे चाटत होते”; जावेद अख्तर भडकले

पुण्यात झिका व्हायरसने घातलयं थैमान; आढळले ‘इतके’ रुग्ण