महाराष्ट्र रायगड

अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल, अर्णव गोस्वामींसह 2 जणांविरोधात गंभीर आरोप

रायगड | इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी रायगड पोलिसांनी अलिबाग मुख्य न्यायदडांधिकारी यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. अलिबाग कोर्टात या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.

या आरोपपत्रात रिपब्लिक टीव्हीचे पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यासह अन्य 2 जणांविरोधात गंभीर आरोप आहेत. त्यांच्यावर अन्वय नाईक यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल आहे.

आरोपपत्रात रायगड पोलीसांकडनं एकूण 65 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. कायदेशीर प्रक्रियेनुसार खटला वर्ग होताना हे आरोपपत्र आता अलिबाग सत्र न्यायालयाकडे सोपवलं जाईल. तिथं आरोप निश्चितीची प्रक्रिया पार पडेल, ज्यासाठी अर्णब गोस्वामींसह अन्य दोन आरोपींची उपस्थिती अनिवार्य राहणार आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याची मागणी करत रिपब्लिक टिव्हीचे सर्वेसर्वा अर्णब गोस्वामी यांनी गुरूवारी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तसेच या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासह तपासाची संपूर्ण प्रक्रिया स्थगित करण्याची मागणीही मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. त्याच्या दुस-याच दिवशी रायगड पोलिसांनी हे आरोपपत्र दाखल केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“यापुढे राज्यातील भाजप नेत्यांनी झेपेल तितकंच बोलावं”

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू दुचाकीवरून दिल्लीकडे रवाना!

प्रताप सरनाईकांनी चौकशीला हजर होण्यासाठी ‘ईडी’कडे मागितली इतक्या दिवसांची मुदत

गाडी घेताना एक रुपयाही भरण्याची गरज नाही; या कंपनीनं आणलीय भन्नाट ऑफर!

रेखा जरे हत्याप्रकरण; आरोपी बाळ बोठेविरोधात लूकआऊट नोटीस जारी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या