शिवसेनेमध्ये पुन्हा नाराजीनाट्य; रायगडमध्ये पक्षाला मोठा धक्का

मुंबई | रायगडमध्ये शिवसेनाला मोठा धक्का बसला आहे. रायगडचे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोपवला आहे. 

प्रकाश देसाई केंद्रीय मंत्री अनंत गीतेंचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र यावेळी ते गीतेंवरच नाराज असल्याची माहिती आहे. शिवसेनेच्या गोटात आता याची चांगलीच चर्चा आहे. 

दरम्यान, जिल्ह्यात उदयोग असूनही शिवसैनिक उपेक्षित आहेत. शिवसैनिकांना रोजगार मिळत नाही, त्यामुळे प्रकाश देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं बोललं जातंय. 

महत्त्वाच्या बातम्या-

-विराटचा ‘ट्रेलर: द मूवी’ प्रदर्शित, अॅक्शन हिरोच्या लुकमध्ये विराट

-मनमोहन सिंग, तुमची उणीव भासत आहे- राज ठाकरे

-…तर मग राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री कसा होणार?; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सवाल

-पुत्रप्रेमापोटी बागवे खोटे आरोप करत आहेत, त्याला कसलाच आधार नाही- गोगावले

-आधार कार्ड मागण्याचा अधिकार खासगी कंपन्यांना नाही- सर्वोच्च न्यायालय

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या