देशात रेल्वे अपघाताचं सत्र सुरूच, साबरमती एक्स्प्रेसचे 12 डब्बे रुळावरून घसरले अन्…

Railway accident | गेल्या काही महिन्यांपासून देशात रेल्वे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. आता अजून एका अपघाताची त्यात भर पडली आहे. काल (16 ऑगस्ट) मध्यरात्री दोन रेल्वे अपघात झाले आहेत. पहिला अपघात कानपूरमध्ये झाला. त्या ठिकाणी साबरमती एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले. तर, दुसरा अपघात हा पश्चिम बंगालमधील (Railway accident) सिलीगुडी-रंगापाणी येथे झालाय.

यामध्ये मालगाडी पटरीवरुन घसरली. सुदैवाने या दोन्ही अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अपघात झाला त्या मार्गावरील सर्व रेल्वे वाहतूक आता रद्द करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅकवर ठेवलेला दगड साबरमती एक्स्प्रेसच्या इंजिनावर आदळल्याने कानपूर येथे पहिला अपघात घडला.

यावेळी रेल्वेमध्ये असणाऱ्या प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाकडून तातडीने व्यवस्था करण्यात आली. सर्व प्रवाशांना बसने कानपूरला पाठवण्यात आले. मात्र, अपघातात रेल्वे इंजिनचे मोठे नुकसान झाले आहे.

मध्यरात्री झाले दोन रेल्वे अपघात

तर, दुसरा अपघात हा इंधन घेऊन जाणाऱ्या मालगाडीचा (Railway accident) झाला. सिलीगुडी – रंगपाणी परिसरात मालगाडी रुळावरून घसरली. याच ठिकाणी अवघ्या 15 दिवसांपूर्वीच एक अपघात घडला होता. तेव्हा आणखी एक मालगाडी रुळावरून घसरली होती. तर, जून महिन्यात कांचनजंगा एक्स्प्रेसचा अपघात झाला होता. यामध्ये अनेकांनी आपला जीव गमावला होता.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या रेल्वे अपघाताची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, साबरमती एक्स्प्रेसचे (वाराणसी ते अहमदाबाद) इंजिन आज पहाटे 02.35 वाजता घसरले. कानपूरजवळ ट्रॅकवर ठेवलेल्या दगडामुळे हा अपघात झाला. आयबी आणि यूपी पोलीस तपास करत आहे. चौकशीनंतर अपघाताचे कारण स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या मदतीसाठी काही हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आले आहेत. ते खाली दिले आहेत.

रेल्वेचे हेल्पलाईन नंबर

प्रयागराज 0532-2408128, 0532-2407353
कानपूर 0512-2323018, 0512-2323015
मिर्झापूर 054422200097
इटावा 7525001249
तुंडला 7392959702
अहमदाबाद 07922113977
बनारस 8303994411
गोरखपूर 0551-2208088(Railway accident)

News Title-  Railway accident Sabarmati Express Mishap

महत्वाच्या बातम्या-

तब्बल 1 महिन्यांनी इंधनदरात घसरण?; जाणून घ्या आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किमती

कुंभ, मकर, मीनसह ‘या’ राशीवर राहील शनीदेवाची कृपा, भाग्य उजळणार!

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कधी?; मुख्य निवडणूक आयुक्तांनी अखेर सांगितलं

काका पुतण्यात दिलजमाई?, युगेंद्र पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

एअर इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी; दहावी पासही करू शकतात अर्ज