रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! 11 हजारांहून अधिक जागांवर होणार भरती, असा करा अर्ज

Railway Board recruitment | रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी युवकांसाठी निर्माण झाली आहे. भारतीय रेल्वे बोर्डाने देशातील तरुणांना रोजगार देण्यासाठी मोठ्या भरतीचे आयोजन केले आहे. या भरतीची अधिसूचना व जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे नोकरी शोधत असाल तर ही संधी वाया घालवू नका. या भरतीसाठी अर्जाची शेवटची तारीख, वय मर्यादा, अर्ज शुल्क याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. (Railway Board recruitment )

रेल्वे विभागाकडून तब्बल 11,558 पदांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये कनिष्ठ लिपीक, लेखा लिपीक, वरिष्ठ लिपीक, लेखा सहायक, कमर्शियल अप्रेंटिस, स्टेशन मास्तर अशी विविध पदे भरली जाणार आहे. यात 8,113 पदवीधर पदे आणि 3,445 पदव्युत्तर पदांचा समावेश आहे. रेल्वे भरती मंडळाने भारतीय रेल्वेमध्ये नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) पदांच्या11,558 रिक्त जागांसाठी या वर्षी भरती जाहीर केली आहे.

शैक्षणिक पात्रता-

पदवीची ३ हजार 445 पदे या भरती अंतर्गत भरली जाणार आहे. यासाठी पदवीधर उमेदवारांना मान्यताप्राप्त बोर्डाकडून बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा समकक्ष शैक्षणिक पात्रता सादर करावी लागणार आहे. पदवीधर उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा काय असणार?

पदवीधर पदसाठी उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षे दरम्यान असावे. तर,पदव्युत्तर पदसाठी उमेदवाराचे (Under Graduate Posts) वय 18 ते 36 वर्षे दरम्यान असावे.(Railway Board recruitment )

अर्ज करण्याची शेवटची तारीख?

पदवीधर पदांसाठी 14 सप्टेंबर पासून अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2024आहे. तर, पदव्युत्तर पदांसाठी 21 सप्टेंबरपासून अर्ज स्वीकारले जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर रात्री 12 वाजेपर्यंत असेल.(Railway Board recruitment )

एकूण जागा किती?

एकूण पदे – 10,884
पदवीपूर्व पदे – 3,404
पदवीधर पदे – 7,479

पोस्ट तपशील-

कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक – 990 पदे
लेखा लिपिक सह टंकलेखक – 361 पदे
ट्रेन क्लर्क – 68 पदे
कमर्शियल कम तिकीट लिपिक – 1985 पदे(Railway Board recruitment )

पदवीधर पदांचा तपशील-

गुड्स ट्रेन मॅनेजर – 2, 684 पदे
चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक – 1,737 पदे
वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक – 725 पदे
कनिष्ठ खाते सहाय्यक सह टंकलेखक – 1,371 पदे
स्टेशन मास्तर – 963 पदे(Railway Board recruitment )

News Title : Railway Board recruitment 2024 

महत्वाच्या बातम्या – 

“फोटोंना काय जोडे मारता, हिम्मत असेल तर समोर येऊन..”; अजित पवारांचं थेट आव्हान

… या नित्या राणेचा बंदोबस्त करा नाहीतर.., ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचा इशारा

पावसाचा जोर कायम! ‘या’ 19 जिल्ह्यांना IMD चा महत्वाचा इशारा

निक्कीवरुन अरबाजची गर्लफ्रेंडची भडकली; म्हणाली…

आनंदाची बातमी! मरीन ड्राइव्हवरुन वांद्रे आता फक्त ‘इतक्या’ मिनिटांत गाठता येणार