देश

रेल्वेकडून दिलासादायक बातमी; विशेष ट्रेनसाठी मिळणार तत्काळ तिकीटाची सुविधा

नवी दिल्ली | कोरोनाच्या संक्रमणाचा धोका पाहता सर्व रेल्वे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र दरम्यानच्या काळात रेल्वेकडून २३० विशेष ट्रेन चालवल्या जात आहेत. आता सर्व विशेष ट्रेनसाठी तत्काळ तिकीटाची सुविधाही प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तत्काळ तिकीटाच्या या सुविधेचा लाभ IRCTC च्या वेबसाईटवर घेता येणार आहे. विशेष ट्रेनने प्रवास करण्याच्या एक दिवस आधी सकाळी १० वाजण्याच्या आत हे तिकीट प्रवाशांना मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येत १२ ऑगस्टपर्यंत मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजर ट्रेनची नियमित वाहतूक बंद राहणार असल्याचं रेल्वेकडून जाहीर करण्यात आलं आहे. मात्र याकाळात विशेष ट्रेन धावणार असल्यानं प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, १४ एप्रिलपूर्वी तिकीट काढलेल्या प्रवाशांना आता पैसे रिफंड करण्याच्या प्रक्रियेला रेल्वेकडून सुरवात करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पुण्यात कोरोनाचं थैमान, जिल्हाधिकाऱ्यांच्या डॉक्टरांना या महत्त्वाच्या सूचना

जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून १ लाख २२ हजार कोरोनाबाधितांवर मोफत उपचार, आरोग्यमंत्र्यांचा दावा

महत्वाच्या बातम्या-

गुड न्यूज! कोरोनावरील पहिली लस भारतात तयार

“…तर सुशांतने भारतासाठी ऑस्कर जिंकला असता”

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधणार, काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या