रेल्वेच्या शौचालयात मोबाईल ठेवून चित्रीकरण करणारा अटकेत

मुंबई | रेल्वेच्या शौचालयामध्ये मोबाईल ठेवून महिलांचं चित्रीकरण करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याला अटक करण्यात आलीय. सलीम शेख असं या आरोपीचं नाव असून तो कल्याणचा राहणारा आहे.

रेल्वेत मेकॅनिकल म्हणून काम करणाऱ्या सलीमने गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनसच्या शौचालयामध्ये मोबाईल फोन ठेवला होता.शौचालयामध्ये गेलेल्या ५० वर्षीय महिलेच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर तीने बाहेरच उभ्या असलेल्या सलीमला प्रवाशांच्या मदतीनं पकडून जीआरपीच्या हवाली केलं.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या