बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रेल्वे रूळ की नदी?, पहिल्या पावसात मुंबईची झाली तुंबई, पाहा व्हिडीओ

मुंबई | मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावलेली दिसत आहे. पहिल्याचं पावसात मुंबईची तुंबई झालेली पाहायला मिळत आहे. अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे मुंबईतील  रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाल्याचं दिसुन आलं आहे.

पावसामुळे मध्य मुंबई रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. मुबईतील सायन रेल्वे स्थानकाचा रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेला आहे. एखाद्या नदीप्रमाणे ट्रॅकमध्ये पाणी वाहताना दिसत आहे. याबबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सायन-कुर्ला भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा थांबवण्यात आली आहे. हार्बर मार्गावरील लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

स्थानकाला नदीचं स्वरूप आल्यामुळे लोकलसेवा थांबवण्यात आली असून अनेकांना आपल्या कार्यालयाकजे जायला अडचण झाली. काहींनी तर वाहत्या पाण्यातून आपला मार्ग काढल तर काहींनी घरी जाण्याच निर्णय घेतला.

दरम्यान, मुंबईतल्या पश्चिम उपनगर अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव दमदार पाऊस सुरू आहे. तर पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु आहे.  मध्य रेल्वेची मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

खुशखबर! लॉकडाऊननंतर फक्त 72 रूपयांमध्ये ‘या’ ठिकाणी राहायची सोय

कौतुकास्पद! कोरोना काळात उपासमार होणाऱ्या 500 माकडांना पोलिस हवलदाराची मदत

ड्रामा क्वीन राखी सावंत बारीक होण्यासाठी करतीये प्रचंड मेहनत, पाहा व्हिडीओ

काँग्रेसला मोठा धक्का! ज्योतिरादित्य शिदेंनंतर या राज्यातील मोठा नेता भाजपच्या गळाला

“आता राहुल गांधी यांनी स्वतः भाजपत प्रवेश करावा, हाच त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More