बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदी सरकारची नवी शक्कल, रेल्वे सुद्धा आता भाड्यानं मिळणार

नवी दिल्ली | अख्खं कुटुंबच फिरायला निघालं की पुर्वीच्या काळात लोकं ट्रक किंवा ट्रॅक्टर सारखे वाहनं भाड्याने घेऊन फिरायला जायचे. कालांतराने यात प्रगती होत ट्रक व ट्रॅक्टरची जागा महामंडळाच्या बस आणि खासगी ट्रॅव्हल्सने घेतली. तर सध्याच्या काळात काही हौशी लोकंही आहेत. जे पर्यटनासाठी थेट विमानच भाड्याने घेतात. पण या सगळ्यांमध्ये तुम्ही रेल्वे भाड्याने मिळत असल्याचं कधी ऐकलं आहे का? (Train On Rent)

रेल्वे मंत्रालयाने ‘भारत गौरव’ (Bharat Gaurav) या नव्या योजनेची घोषणा केली आहे. म्हणजेच ‘थीम बेस रेल्वे’ चालवण्यासाठी रेल्वे मंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. या योजनेत पर्यटनासाठी गाड्या चालवायला मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेलाच पर्यटनासाठी रेल्वेच बुक करायची असेल तर ती करता येणार आहे आणि कोणत्या रूटवर कोणती गाडी धावणार, त्याचं भाडं काय असणार, याचे अधिकार ऑपरेटरकडे असणार आहेत.

जवळपास 150 रेल्वे गाड्या भाड्यावर दिल्या जाणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री आश्र्विनी वैष्णव यांनी दिली आहे. तर या गाड्यांनी 3 हजारांपेक्षाही जास्त कोचेस असणार आहेत तर प्रत्येक रेल्वेला 14 ते 20 कोचेस जोडले जाणार आहेत. सध्या सुरू असलेली रामायणा एक्सप्रेस (Ramayana Express) भारत गौरव योजनेअंतर्गत चालवली जात आहे. तर सफारी एक्सप्रेस, गुरूकृपा एक्सप्रेस, साऊथ इंडिया दर्शन या रेल्वेही खासगी व्यक्ती किंवा संस्था चालवणार आहेत.

ही थीम बेस रेल्वे (Theme Base Railway) बुक करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. तर याची वन टाईम फी ही 1 लाख रूपये आहे. कमीत कमी 2 तर जास्तीत जास्त 10 वर्षांसाठी तुम्हाला ही रेल्वे भाड्याने घेता येणार आहे. यासाठी सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून प्रत्येक रेकसाठी 1 कोटी भरावे लागणार आहेत. तर पर्यटनासाठी रेल्वे बुक केल्यावर सदर ऑपरेटरला प्रवाशांना खाण्यापासून ते मनोरंजनापर्यंत सगळ्या सुखसुविधा द्याव्या लागणार आहेत.

थोडक्यात बातम्या-   

 “सर्व कर्जबुडव्यांचा शोध घेतला जाईल आणि आपल्या देशाचा पैसा परत आणला जाईल”

मोठी बातमी! देशातील कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय मोठी घट

कोरोनानं टेंशन वाढवलं; WHO कडून ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

वादग्रस्त कृषी कायदे रद्द होणार?, आज होणार अंतिम निर्णय

‘अर्ध्यावरती डाव मोडला, अधूरी ड्रग्जची कहाणी’, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More