बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नोकरीची सुवर्णसंधी; रेल्वेने केली ‘ही’ मोठी घोषणा

नवी दिल्ली | रेल्वे ही आपल्या सोईसुविधांसाठी ओळखली जाते. देशातील सर्वात मोठ्या शासकीय भांडवलाचा समावेश असल्याने रेल्वे ही कायम चर्चेत असते. संपुर्ण कार्यक्षेत्र हे भारत असलेल्या रेल्वेच्या काही महत्वाच्या सुविधा आणि आकर्षक योजना या आपल्याला माहित आहेत. नोकरीच्या संधी पण भरपूर आहेत.

भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छित असणाऱ्या प्रत्येकासाठी ही सुवर्णसंधी आहे. उत्तर रेल्वेकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. 3500 जणांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लखनऊ आणि वाराणसी या शहरामध्ये हे प्रशिक्षण होणार आहे. यातून योग्य उमेदवारांची निवड होणार आहे, असं रेल्वेकडून कळवण्यात आलं आहे.

भारतीय रेल्वेने कौशल्यपुर्ण प्रशिक्षणावर भर द्यायचं धोरण आखलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय रेल्वे आपल्या विभागामार्फत हे प्रशिक्षण देणार आहे. पंतप्रधान कौशल विकास योजनेअतंर्गत देशातील तरुणांना रेल्वेच्या संबंधित प्रशिक्षण दिलं जाईल. जेणेकरून त्यांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतील. केंद्र सरकारने 2015 साली कौशल्य विकास योजनेचा प्रारंभ केला होता असं उत्तर रेल्वेचे महाप्रबंधक आशुतोष गांगल हे म्हणाले आहेत.

भारतीय रेल्वे ही विशेष कौशल्यावर भर देणार आहे. इलेक्ट्रिशियन व फिटर या प्रमुख पदांचा यामध्ये समावेश आहे. या सर्वांना 100 तास प्रशिक्षण दिले जाईल. यात प्राक्टिकलवर भर देण्यात येणार आहे. 70 तासांचं प्राक्टिकल होणार आहे. तर 30 तासांची लेखी होणार आहे. यासाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल.

थोडक्यात बातम्या 

डेल्टा प्लस व्हेरिएंटनं वाढवली चिंता; अभ्यासातून धक्कादायक माहिती आली समोर

अडवण्याची भाषा करणाऱ्यांनी चड्डीत राहावं- नितेश राणे

‘अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींना भारतात येण्याचं आमंत्रण द्या’; ‘या’ भाजप खासदाराचं वक्तव्य

“पटोलेंनी आपली उंची पाहून टीका करावी, ते प्रदेशाध्यक्ष झाले म्हणजे…”

पोस्टाची बंपर योजना! 1400 रुपयांच्या प्रीमियमवर ‘इतके’ लाख मिळणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More