Ahmednagar l गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्यात आल्याची घोषणा केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरमधील चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये नामांतराची घोषणा केली होती. यानंतर अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘अहिल्यानगर’ करण्याचा ठराव देखील महापालिकेत मांडण्यात आला होता. मात्र आता यासंदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
अखेर अहमदनगरचे नामांतर :
अहमदनगर शहराचं नाव अहिल्यानगर करण्यासाठी अहमदनगर महापालिका प्रशासक सर्वसाधारण सभेकडून नामांतर प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र महापालिकेनंतर आता जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने देखील हिरवा कंदिल दाखवला आहे.
मागील कित्येक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी वारंवार केली जात होती. मात्र अहमदनगर जिल्ह्याचे नाव हे ‘अहिल्यानगर’ करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत होती. या सर्व बाबींचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ केल्याची घोषणा देखील केली होती. त्यानंतर महानगरपालिकेने देखील नामांतराचा ठराव मंजूर केला होता.
Ahmednagar l अहिल्यानगर नावास रेल्वे मंत्रालयाने दाखवला हिरवा कंदिल :
अशातच आता अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे आता आहिल्यानगर हे नाव देण्यास रेल्वे विभागाची कोणतीही हरकत नसल्याचे पत्र दिल्याने जिल्ह्याच्या नामांतराचा मार्ग सुकर झाला आहे अशी माहिती महसूल राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराच्या बाबतीतील सर्व प्रक्रिया ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत पूर्ण झाली आहे. मात्र त्यासाठी प्रत्येक विभागाची ना हरकत आवश्यक असते. अशातच आता केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नामांतराच्या बाबतीत हरकत नसल्याचे पत्र देखील जारी केले असून आता अहिल्यानगर नावास मान्यता दिली आहे. तसेच आहिल्यानगर या नावाचे कोणतेही रेल्वेस्थानक देशात नसल्याचे त्यांनी आपल्या पत्रात नमुद केले आहे.
News Title : Railways Approved The Ahmednagar Name Change To Ahilyanagar
महत्त्वाच्या बातम्या-
टाटा कंपनीची भन्नाट कार बाजारात लाँच; किंमत असणार फक्त…
रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! 11 हजारांहून अधिक जागांवर होणार भरती, असा करा अर्ज
“फोटोंना काय जोडे मारता, हिम्मत असेल तर समोर येऊन..”; अजित पवारांचं थेट आव्हान
… या नित्या राणेचा बंदोबस्त करा नाहीतर.., ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचा इशारा