रेल्वेने घेतला महत्त्वाचा निर्णय; फक्त ‘या’ प्रवाशांना मिळणार सवलत
नवी दिल्ली | देभरात रेल्वेचं मोठं जाळं उभारण्यात आलं आहे. गेल्या काही वर्षांपासून ज्येष्ठ नागरिक, कलाकार, खेळाडू अशा व्यक्तींना रेल्वेच्या तिकीटामध्ये सवलत दिली जाते. आता या सवलती बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. दूरचा प्रवास असेल तर अनेक नागरिक रेल्वेला पसंती देतात. कमी दरात आरामदायी प्रवासामुळे रेल्वेनं प्रवास करतात.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या आठवड्यातच लोकसभेत माहिती दिली होती. देशात कोरोनासाथीमुळे अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोनामुळे रेल्वेने अनेक सवलती 20 मार्च 2020 रोजी थांबवल्या होत्या. अजूनही या सवलतींवरील बंदी कायम आहे. सवलती का रद्द कराव्या लागणार आहेत, याविषयी अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली होती.
रेल्वे प्रवाशांना अनेक सवलती दिल्याने रेल्वेवर अधिकचा भार पडतो. कोरोनामुळे रेल्वेच्या महसूलात मोठी घट झाली आहे. यामुळे रेल्वे प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसोबतच इतर प्रवाशांना सवलती देणं शक्य नसल्याचं रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं होतं. 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये रेल्वेला 50 हजार 669 कोटी रूपयांचा महसुल मिळाल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली होती. मात्र, त्यानंतर मोठी घट झाल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, रेल्वेकडून अनेकांच्या सवलती रद्द करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, पुरस्कार प्राप्त व्यक्ती, युद्धात शहिद झालेल्या सैनिकांच्या पत्नी, विद्यार्थी, तरूण आणि शेतकरी यांच्या सवलती रद्द करण्यात आलेल्या आहेत. तसेच कलाकार, खेळाडू आणि पत्रकार यांचीही सवलत रद्द करण्यात आली आहे. रेल्वेकडून आता फक्त दिव्यांग व्यक्ती आणि काही आजाराने ग्रस्त असलेले रूग्ण यांना सुट देण्यात आली आहे.
थोडक्यात बातम्या-
“काँग्रेसचा उमेदवार भाजपला द्या, आमदार बनवून दाखवतो”
“यांची हाडं राजकीय स्मशानात रचली गेली आहेत, त्यांना आता…”
मोठी बातमी! केंद्र सरकारने कोरोना निर्बंध हटवले, ‘या’ 2 अटी मात्र कायम
मोठी बातमी! युक्रेनवर ताबा मिळवण्यासाठी रशियाचं धक्कादायक पाऊल
सर्वसामान्यांना धक्का, सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ; वाचा ताजे दर
Comments are closed.