बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रवासी वाहतूक सुरू करण्याबाबत रेल्वेचा मोठा निर्णय; वाचा काय म्हणतायेत रेल्वेमंत्री…

नवी दिल्ली |  कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या देशव्यापी लॉकडाऊन सुरू आहे. हा लॉकडाऊन अखंडित सुरू होऊन सुमारे दीड महिना झाला आहे. आता सरकार लॉकडाऊनमध्ये उठवण्याच्या तयारीत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रवासी वाहतुकीबाबत रेल्वेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

12 मे पासून देशात प्रायोगिक तत्त्वावर प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा रेल्वे मंत्रालयाने निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी स्वत: ट्विट करून दिली आहे.

12 मे पासून देशात प्रायोगिक तत्त्वावर रेल्वेच्या 15 विशेष गाड्या राजधानी नवी दिल्लीला भारतातील प्रमुख शहरांशी जोडतील. नवी दिल्लीहून रांची, हावडा, बिलासपूर, बेंगलुरू, भुवनेश्वर, जम्मू मुंबई सेंट्रल या आणि अशा प्रमुख शहरांमधून रेल्वे सुरू होणार आहेत. या गाड्यांचे बुकिंग 11 मे रोजी संध्याकाळी 4 वाजता आयआरसीटीच्या वेबसाईटवर सुरू होईल.

रेल्वे स्टेशनवर तिकीटांची विक्री होणार नाही, असं देखील रेल्वेने स्पष्ट केलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला दिलासा देण्याच्या दृष्टीने प्रवासी वाहतूक सुरू करणं हे गरजेचं असल्याने रेल्वेने हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

उरणमध्ये एकाच कुटुंबातील 21 जण कोरोनाबाधित; रायगडची पुन्हा रेड झोनकडे वाटचाल

उद्धव ठाकरे अस्वस्थ, त्यांना अशाप्रकारच्या राजकारणात रस नाही- संजय राऊत

महत्वाच्या बातम्या-

शिवरायांच्या रायगडावरील राज्याभिषेक सोहळ्यासंदर्भात संभाजी राजेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

अर्थमंत्र्यांनी बोलावली सरकारी बँक अधिकाऱ्यांची बैठक; उद्या मोठी घोषणा होण्याची शक्यता

दिलासादायक! पुणे विभागातील ‘इतके’ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More