मुंबई | मुंबईत लोकलची संख्या वाढवण्यात आली आहे. आता तब्बल 350 लोकल धावणार आहे. या लोकलमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवेश मिळणार आहे. सर्वसामान्य प्रवाशांसाठी मात्र लोकल सेवा बंदच राहणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत उद्यापासून 350 लोकल धावणार आहेत. यात आवश्यक कर्मचारी, केंद्र, आयटी, जीएसटी, सीमाशुल्क, टपाल, राष्ट्रीयकृत बँका, एमबीपीटी, न्यायपालिका, संरक्षण आणि राजभवनाच्या कर्मचार्यांना प्रवास करता येणार आहे. सर्वसामान्यांना मात्र अद्याप लोकलमधून प्रवास करता येणार नाही.
या प्रवाशांना तिकीटासाठी तिकीट खिडक्या उघडल्या जातील. त्यावर संबंधित कर्मचाऱ्यांनी शासकीय ओळखपत्र दाखवल्यास त्याला तिकीट मिळू शकते. तसेच पासधारक तिकिटांची वैधता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या आयडी कार्डच्या माध्यमातून त्यांना स्थानकांवर प्रवेश दिला जाईल. यानंतर कर्मचाऱ्यांना क्यूआर कोड आधारित ई-पास दिले जातील. जे कर्मचारी वैद्यकीय दृष्ट्या सुदृढ आहेत. त्याच व्यक्तींना लोकलमधून प्रवास करता येणार असल्याची माहिती आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
सॅनिटायझर प्यायल्याने नागपुरात सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू
#DoctorsDay- ‘कोरोनासारख्या संकटाविरूद्ध लढणाऱ्या डॉक्टरांना सलाम’
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू, लग्नात हजर 100 पेक्षा अधिक जणांना कोरोना
‘विठ्ठला मानवाने या संकटापुढे हात टेकले….आतातरी चमत्कार दाखव’; मुख्यमंत्र्यांची विठुरायाला साद
राज्यात आज ४८७८ नवीन रुग्णांचे निदान तर रिकव्हरी रेट ५२ टक्क्यांवर कायम!