नवी दिल्ली | कोरोना व्हायरसचा (Corona Virus) प्रादुर्भाव ओसरत असल्याने आता रेल्वेकडूनही (Railway) प्रवाशांवर लादण्यात आलेले निर्बंध कमी केले जात आहेत. रेल्वेने बुधवारी मोठा निर्णय घेत प्रवाशांना दिलासा दिला आहे.
रेल्वेने बुधवारी तिकीट बुकिंगबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता प्रवाशांना रेल्वे तिकीट बुक करताना आपला डेस्टिनेशन अॅड्रेस (Destination Address) टाकण्याची गरज नाही. तिकीट बुक करताना आता IRCTC प्रवाशांना त्यांच्या डेस्टिनेशन अॅड्रेस विचारणार नाही.
कोरोना महामारिच्या काळात रूग्णांना ट्रेस करण्यासाठी डेस्टिनेशन अॅड्रेसची मदत होत होती. त्यामुळे रेल्वेने प्रवाशांना डेस्टिनेशन अॅड्रेस टाकणं बंधनकारक करण्यात आलं होतं. मात्र, आता कोरोना निर्बंध शिथील करण्यात आल्याने रेल्वे मंत्रालयाने तिकीट आरक्षणादरम्यान डेस्टिनेशन अॅड्रेस टाकण्याची तरतूद रद्द केली आहे.
दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने याबाबतचे आदेश जारी केल्यानंतर रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना काळात रेल्वेने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. महामारी काळात लादलेले अनेक निर्बंध आता हळूहळू शिथील करण्यात येत असून देशात रेल्वे सुविधा पूर्ववत होत आहे.
थोडक्यात बातम्या-
‘मंजुलिका’ पुन्हा परतली….; ‘भूल भुलैंया 2’ चा धमाकेदार टीझर रिलीज
चक्क 1 रूपयांत मिळणार 1 लीटर पेट्रोल, जाणून घ्या कुठे मिळतीये ऑफर
अखेर NCB ला नवीन झोनल डायरेक्टर मिळाले; वानखेडेंच्या जागी ‘या’ अधिकाऱ्याची वर्णी
सुजात आंबेडकर राजकारणात येणार?, प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले
‘तुम्ही राज्य चालवताय, का हजामत करताय?’, राजू शेट्टी संतापले
Comments are closed.