बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Monsoon Update| राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी

मुंबई | जून महिन्याचे 15 दिवस उलटले तरी अद्याप पाऊस हवा तसा पडत नसल्याने नागरिक हैराण झाले होते. मुंबई आणि नवी मुंबईमध्ये पावसाच्या सरी आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज दर्शवला आहे.

विदर्भात पावसाचे आगमन झाले आहे. अमरावती,वाशिम,गोंदियात देखील पावसाचे आगमन झाले आहे. अमरावतीत तुफान पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाचा अंदाज आहे. तर दक्षिण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

राज्यात आजपासुन पावसाचा जोर वाढणार आहे. पालघरमध्ये हलक्या सरी बरसल्या आहेत. पावसामुळे पेरणी खोंळबल्याने त्या भागातील शेतकरी चिंतेत आहेत. गोंदियामध्येही पावसाने हजेरी लावली.

दरम्यान, महाराष्ट्रात काही जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जाहिर करण्यात आले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर हवा तसा पाऊस अजुनही पडला नसल्याने नागरिकांना पावसाची प्रतिक्षा आहे.

थोडक्यात बातम्या

ऐन विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ

कोरोनाचं थैमान! 24 तासांतील धडकी भरवणारी आकडेवारी समोर

विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर नाना पटोलेंचा खळबळजनक खुलासा

अभिजीत बिचुकले राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरणार, म्हणाले…

अभिनेत्री काजल अग्रवालच्या बाळाचं नाव आहे अगदी खास, पोस्ट शेअर करत म्हणाली…

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More