बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लय जबरी पाऊस होणार!, महाराष्ट्रातील ‘या’ 6 जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी

मुंबई | अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. पुण्यासह अन्य 13 जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस बरसला होता. थंडी सुरू झाली असं वाटत असतानाच पावसाने पुनरागमन केल्याने सर्वांच्याच चिंता वाढल्या आहेत. (Rain Alert issued for 6 districts of Maharashtra)

रब्बी हंगामाचं पीक आता काढणीवर आलं आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या चिंता वाढताना दिसत आहेत. राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावल्यानंतर आता आणखी दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे या सहा जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. याठिकाणी वाऱ्याचा वेग देखील 30 ते 40 किमी प्रतितास असणार आहे.

दरम्यान, राज्यातील ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, लातूर आणि नांदेड या 10 जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या 10 जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.

थोडक्यात बातम्या

पुण्यात मोठी खळबळ, तृतीयपंथीयासोबत घडला अत्यंत निर्घृण प्रकार

“तुझं नशिब नाहीतर…”, गंभीरनं कॅप्टनवरच टीका केल्यानं क्रिकेट जगतात मोठी खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याकडून 4 लाखांची वसुली, तिघांना पकडले

देवेंद्र फडणवीसांना पाहून काँग्रेसच्या आमदारानं काढला पळ, कारणही सांगितलं…

“वडिलांना वचन दिलं म्हणून दुसऱ्याचं मुख्यमंत्रिपद घेतलं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More