बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात पुन्हा पावसाचं संकट; महाराष्ट्रातील ‘या’ सहा जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई | गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात पावसाने पुनरागमन केलं आहे. गेल्या आठवड्याभरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागात दरड कोसळण्याच्या घटना देखील घडल्या. तर काही भागात पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं होतं. त्यानंतर जनजीवन पुर्वपदावर येत असतानाच आता हवामान विभागाने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजामुळे आता महाराष्ट्राच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानं 6 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 27 आणि 28 जुलैला हवामान खात्यानं पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि ठाणे या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या भागात येत्या 48 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तर येत्या 29 आणि 30 तारखेला काही भागात अतिवृष्टीसदृष्य पावसाची शक्यता आहे. 29 आणि 30 तारखेसाठी हवामान खात्यानं 5 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यात रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी 29 आणि 30 तारखेला यलो अलर्ट दिला आहे.

दरम्यान, येत्या 30 तारखेपर्यंत हवामान खात्यानं अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे आता कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता असल्यानं प्रशासन देखील तयारीला लागलं आहे. मध्यप्रदेश आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं आता कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी झालं आहे.

थोडक्यात बातम्या-

महापुरामुळे चिंताग्रस्त असलेल्या शरद पवार यांची तातडीची पत्रकार परिषद

‘लवकरच तो दिवस उगवेल’;संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना खास शुभेच्छा

अरे देवा! मंदिरात जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीत कोरोनाही चिरडुन गेला, पाहा व्हिडीओ

सकारात्मक बातमी! सोमवारी देशात मागच्या 100 दिवसातील सर्वात कमी कोरोना रूग्णांची नोंद

पुरात अडकलेल्या कोरोना रूग्णाच्या मदतीसाठी सरसावले एनडीआरएफचे जवान, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More