महाराष्ट्र मुंबई

येत्या 24 तासांत ‘या’ भागात पावसाचा अंदाज!

मुंबई | गेल्या 24 तासात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर, मुंबई आणि पुण्यासह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात येत्या 24 तासात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दक्षिण मध्य अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पावसाळी वातावरण तयार आहे. त्यामुळे आज आणि उद्या 9 जानेवारीला राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. गुरुवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे.

दरम्यान, गुरुवारी अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले असून शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

राज्यातील नव्या कोरोना स्ट्रेनचे तिन्ही प्रवासी पिंपरी चिंचवडचे- राजेश टोपे

ठाकरे सरकारची ही रोजचीच बोंबा बोंब आहे- देवेंद्र फडणवीस

मला महिलांच शरीर आवडतं, पण डोकं नाही- राम गोपाल वर्मा

नांदा सौख्यभरे! अखेर विधवा भावजयीसोबत लहान दिरानं बांधली लग्नगाठ!

“पीडित महिला संध्याकाळी घराबाहेर पडली नसती तर बलात्काराची घटना टळली असती?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या