बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ज्याची भीती होती तेच झालं! भारत-न्युझीलंड अंतिम सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाचा खोळंबा

मुंबई | जागतिक कसोटी अजिंक्य स्पर्धेच्या सामन्याकडे सर्व क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. मात्र जी भाती वाटत होती तसच झालं आहे. पावसाने सामन्याला सुरूवातही होऊन दिली नाही. त्यामुळे पहिल्या सत्राचा खेळ होणार नाही.

पंचांनी सामन्यापूर्वी मैदानाची पाहणी केली तेव्हाही पाऊस थांबला नव्हता, यामुळे पहिल्या सत्राचा खेळ होऊ शकणार नाही असं जाहीर केलं. बीसीसीआयने याबाबत माहिती दिली असून नाणेफेकही दुसऱ्या सत्रात होणार आहे. साऊथम्पटनमध्ये पुढील आणखी काही दिवस पाऊस पडणार असल्याचा अंदाड हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे संपुर्ण सामन्याबाबत प्रश्नचिन्ह तयार झालं आहे.

पावसाच्या वातावरणामुळे बीसीसआयने एक दिवस राखून ठेवला आहे. त्यामुळे जर निकाल लागला नाही तर राहिलेला सामना हा सहाव्या दिवशी खेळवण्यात येणार आहे. मात्र याबाबत मॅच रेफ्री निर्णय घेणार आहेत. सामना जर ड्रॉ झाला तर दोन्ही संघांना विजयी घोषित करण्यात येणार आहे. त्यासोबतच बक्षीसाची रक्कमही समान वाटून देण्यात येणार आहे.

दरम्यान, सर्व क्रीडाप्रेमी पाऊसाने थांबावं अशी प्रार्थना करत आहेत. भारताने आपला संघ जाहीर केला आहे. त्यामध्ये भारतीय संघ- विराट कोहली कर्णधार , रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रविचंद्रन आश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी यांचा समावेश करण्यात आला आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

राष्ट्रवादी-शिवसेना युतीबाबत संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

“शिवसेना भवनासमोर जो राडा झाला त्याचं उत्तर भाजपला दिलं जाईल”

बीजेपीची बिघडलेली छत्री काँग्रेसच्या छत्री दुरूस्ती केंद्रावर; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

“नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळत असल्यास माझ्या शुभेच्छा आहेत, पण…”

नरेंद्र मोदींचा जगात गाजावाजा, बायडन यांनाही मागे टाकलं, लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वलस्थानी!

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More