बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पावसाची बातमी! पुण्यासह सातारा जिल्हात पावसाचं पुनरागमन

पुणे | राज्यात दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारली आहे. भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुणे आणि सातारा जिल्ह्यात हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरूवात झाली आहे. पुणे आणि सातारा जिल्हाच्या विविध भागात आज पावसानं हजेरी लावली. सातारा जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाच्या सरी अधून मधून बरसत आहेत.

पुण्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. आज दुपारी शहराच्या कात्रज, भारती विद्यापीठ, डेक्कनसह धनकवडीच्या भागात पावसाला सुरूवात झाली आहे. पुण्यात गेल्या आठवड्यापासुन पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे पुणेकरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

सातारा जिल्ह्यातही पावसाचं पुनरागमन झालं आहे. आज सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाली आहे. सातारा जिल्ह्यात ग्रामीण भागातसुद्धा सकाळपासूनच पावसानं हजेरी लावलेली दिसली. गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं.

भारतीय हवामान खात्याचे अधिकारी आणि हवामान अभ्यासक के. एस. होसाळीकर यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे. मुंबई आणि रायगड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाजही होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे.

थो़डक्यात बातम्या –

“बाबासाहेब पुरंदरे म्हणजे इतिहासाबरोबर वर्तमानाची जाग आणणारा एक महापुरूष”

अनिल कपूरच्या घरी लगीनघाई; मुलीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू

राहुल गांधींना ट्विटरकडून दिलासा; आठवड्याभरानंतर अकाऊंट अनलाॅक

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांची होणार चौकशी; कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप

‘शिवसेनेच्या दहशतीमुळेच…’; केंद्रीय मंत्री नितीन गडकरीचं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More