बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाकिस्तानात ‘नोटांचा पाऊस’; पैसे गोळा करण्यासाठी उडाली झुंबड, पाहा व्हीडिओ

पाकिस्तान | कर्जात बुडालेल्या पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मंडी बहाउद्दीन येथे नोटांचा पाऊस पाडला गेला. एका लग्न समारंभासाठी जमलेल्या वऱ्हाडी मंडळींवर नोटांचा आणि फुलांचा वर्षाव केला गेला. सोशल मीडियावर याचा व्हीडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

ज्या मुलाचं लग्न आहे त्याचा भाऊ परदेशात वास्तव्याला असून आपल्या भावाच्या लग्नासाठी तो पाकिस्तानात परत आला. त्यावेळी या भावाने हेलिकाॅप्टर भाड्याने घेऊन लग्नाला जमलेल्या वऱ्हाडी मंडळींवर पैशांची बरसात केल्याचं बोललं जात आहे.

महत्वाची बाब अशी की पाकिस्तानात हे असं पहिल्यांदा घडत नाहीये. याआधी गुजरांवाला येथे एका उद्दोगपतीने आपल्या मुलाच्या लग्नात वऱ्हाडी  मंडळींवर डाॅलर्सची बरसात केली होती. त्याचाही व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी चक्क लोकं गाड्यांवर उभं राहून वऱ्हाडी मंडळींवर पैशांची उधळण करत होते.

इम्रान खान देशावरील वाढतं कर्ज आणि महागाईमूळे आधीच संकटात सापडले आहे. देशात बेरोजगारी समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. विविध देशांकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेऊन पाकिस्तानला आपले दिवस काढावे लागत आहेत. याआधी पाकिस्तानमधल्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर 1 लाख 75 हजार कर्ज आहे असा आहवाल समोर आला होता.

थोडक्यात बातम्या –

चाहत्यानं दिलेलं गिफ्ट पाहून रितेश देशमुख झाला भावूक; पाहा व्हिडीओ

“कोरोनाचं महाराष्ट्रावर प्रेम आहे की ठाकरे सरकारचं कोरोनावर”

‘ही’ थ्री-व्हीलर इलेक्ट्रीक कार 2 रूपयात 5 किमी धावणार!; जाणून घ्या किंमत…

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षा गायकवाड यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती!

राज्यातील ‘या’ भागात हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More