महाराष्ट्र मुंबई

पुढील दोन दिवसांत ‘या’ भागात पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

Photo Credit - Pixabay

मुंबई | मुंबईसह राज्यात पुढील दोन दिवस काही ठिकाणी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितनूसार राज्याच्या हवामानात लक्षणीय बदलांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात घट झाली आहे.

हवामानात झालेल्या बदलांमुळे तुरळक ठिकाणी पुन्हा एकदा थंडीचा प्रभाव जाणवत आहे. यामुळे बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. या बदलांमुळे पिकांचे नुकसान व्हायला नको, यासाठी शेतकऱ्यांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

पुढील दोन दिवस म्हणजे 17 आणि 18 फेब्रुवारीला राज्यात काही ठिकाणी हलक्या तर बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

रत्नागिरी, माथेरान, उस्मानाबाद, सातारा, बारामती, मालेगाव, बीड, औरंगाबाद, परभणी, पुणे, महाबळेश्वर, नांदेड, मुंबई, सांगली, नाशिक, जळगाव, आणि नागपुर या जिल्हांचे किमान तापमान 20 अंशाखाली नोंदवण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मुंबई महापालिका निवडणुकीआधी सर्वोच्च न्यायालयाचा भाजपला झटका!

देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंसाठी समर्पित केलं ‘हे’ प्रसिद्ध गाणं!

मुख्यमंत्री इन अ‌ॅक्शन मोड; वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांना दिले ‘हे’ आदेश!

लॉकडाऊनसंदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…

पुण्यातील ‘या’ भागात विद्यार्थ्यांसाठी सरकार 9 मजली भव्य वसतीगृह उभारणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या