बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याला उकाड्यापासून दिलासा; संपूर्ण जिल्हाभरात मुसळधार पावसाला सुरुवात

अहमदनगर | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली आहे. या वर्षी मान्सून वेळेच्या आधीच दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यातच उकाड्याने त्रस्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात तसेच इतरही ठिकाणी आज मुसळधार पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसाने उकाड्यापासून दिलासा दिला आहे.

संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात आज जोरदार पावसाने हजेरी लावली असून वादळी वाऱ्यासह सोसाट्याचा वारा वाहू लागला. दरम्यान, मान्सूनपूर्व पावसाने नागरिकांना दिलासा मिळाला असून संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळालं.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात कोकण किनारपट्टी व मुंबईत नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यानंतर, आता शेतकऱ्यांसह सर्वजण मान्सूनची वाट पाहत असतानाच अहमदनगर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलं आहे. येत्या काही दिवसातच मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या –

20 रुपये दिले नाही म्हणून पतीची हत्या, मुलांचा सांभाळ कोण करणार? पत्नीचा टाहो

ब्लॅक फंगस आजारावरील उपचाराबाबत राज्य सरकारचं उच्च न्यायालयात ‘हे’ मोठं स्पष्टीकरण

लसीकरणाबाबत मोठी बातमी! ऑनलाईन नोंदणी न करताही 18 ते 44 वयोगटाला मिळणार कोरोना लस; जाणून घ्या कसं

रुग्णालयाची खिडकी तोडून अडाणी चोरट्यांनी कोरोना लस समजून नेले ‘हे’ 25 लसींचे डोस

धडकी भरवणारा अपघात! चेकपोस्ट टाळण्यासाठी केलेल्या स्टंटबाजीने एकाचा जागीच मृत्यू, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More