कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईला देखील पाऊस झोडपणार

Rain Update | कोकण किनारपट्टीवर पावसाने थैमान घातलं आहे. यासोबतच मुंबई विभागाला मोठा अलर्ट जारी केला आहे.   मुंबई मध्ये देखील मुसळधार पाऊस होण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. कोकण किनारपट्टीसाठी महत्वाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलंय. (Rain Update)

8 जुलै रोजी मुंबई आणि कोकणात पावसाने धूमशान घातले होते. दुसऱ्या दिवशी 9 जुलै रोजी देखील जोरदार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला. त्यावेळी राज्य सरकारने सुट्टी जाहीर केली होती. मात्र त्यानंतर निसर्गाने चेष्टा केली आणि उन्हाने आपली उपस्थिती दर्शवली आहे. (Rain Update)

होसाळीकरांचं ट्विट

हवामान विभागाने तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान अभ्यासक होसाळीकर यांनी ट्विट करत दक्षिण आशियाच्या भागात पाऊसाचे सर्वाधिक प्रमाण असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्याठिकाणी 700 एमएम पाऊस पडणार असल्याचा दावा केला आहे. (Rain Update)

समुद्र सपाटीवरील कोकण किनाऱ्यावरील असणाऱा कमी दाबाचा पट्टा हा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ दरम्यान सक्रिय झाला आहे. तर राज्याचा विचार केला तर कोकण भाग, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाण तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार असल्याची शक्यता असते. कोकणात 18 जुलै रोजी रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Rain Update)

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला पुढील तीन ते चार दिवस तुरळक ठिकाणांवर खूप पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

साताऱ्यात 18 ते 20 जुलैला घाट विभागात खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे सातारा घाट माथ्यावर पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. (Rain Update)

News Title – Rain Update 200 To 500 MM Rain Warning In Konkan And Mumbai

महत्त्वाच्या बातम्या

“माझ्यासोबत धोका..”, लग्नाच्या काही दिवसांनीच सोनाक्षीच्या नवऱ्याने केलं असं काही की..

1500 रूपयांमध्ये लाडक्या बहिणीचं घर चालेल का?, संजय राऊतांचा हल्लाबोल

“छगन भुजबळ राजकारणातील फिरता रंगमंच, ते नाट्य देखील निर्माण करतात”

ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चेला जोर; अभिषेकच्या ‘त्या’ कृतीने सगळ्यांनाच धक्का

आज ‘या’ राशींच्या व्यक्तींना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता!