Rain Update | राज्यात अतिमुसळधार पावसाने जोर धरला आहे. मुंबई आणि कोकणात मुसळधार पावसाने जोर धरला आहे. विदर्भातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना रेट अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सुर्यापल्ली गावातील शाळेत दुपारपासून पाणी शिरू लागले आहे. (Rain Update)
पाण्याच्या वाढत्या वेगामुळे 120 विद्यार्थी शाळेत अडकले आहेत. पाऊस कधी कमी होईल याची वाट पालक आणि प्रशासन पाहत होते. अखेर पाऊस कमी झाल्यावर रेस्कूच्या माध्यमातून ऑपरेशन सुरू झाल्याचं दिसलं. शेवटी रात्री दोन वाजताच्या सुमारास विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढण्यात झाले. (Rain Update)
गडचिरोली शाळेत पाणीच पाणी
गडचिरोली जिल्ह्यात सूर्यापल्ली गावात आणि माडेल शाळेत गुरूवारी तलावाचे पाणी शिरल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. गडचिरोली रामजापूर येथील माडेल शाळेत तीन ते चार फूट पाणी शिरले. शाळेत 120 विद्यार्थी होते. त्या विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित बाहेर काढलं. पुराच्या पाण्यातून रेस्कू करावे लागले. (Rain Update)
पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या टीमने जवळपास 120 विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित बाहेर काढले. कारमेल शाळेतून कस्तुरबा बालिका विद्यालयामध्ये या विद्यार्थ्यांना सुरक्षित हलविण्यात आले. रात्री अंधारात हे सर्व ऑपरेशन सुरू होतं. सर्व विद्यार्थी सुखरूप निघाल्यानंतर पालकांच्या जीवात जीव आला. (Rain Update)
अशातच सुर्यपल्ली गावातील 14 घरांमध्ये पाणी साचलं होतं. गडचिरोली जिल्ह्यात रेट अलर्ट जारी केला आहे. परभणी जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोयाबीन आणि कापूस पिके देखील चांगली बहरली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यातून समाधान व्यक्त केला जात आहे.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
शाळेत पाणी, विद्यार्थी अडकले पुराच्या पाण्यात, रात्रभर चालले ऑपरेशन pic.twitter.com/m1AdrsbzCC
— jitendra (@jitendrazavar) July 19, 2024
News Title – Rain Update Gadchiroli District 120 Student Trapped In Flood Water
महत्त्वाच्या बातम्या
सावधान! हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट
निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा!
विठ्ठलाचं दर्शन घेऊन परतणारी वारकऱ्यांची जीप थेट विहिरीत कोसळली; 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू
चार वर्षांच्या संसारानंतर हार्दिक-नताशा विभक्त; घटस्फोटानंतर नताशाला किती रक्कम मिळणार?
घराबाहेर पडण्यापुर्वी ही बातमी नक्की वाचा!