पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी!

Rain Update | राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरासह आता ग्रामीण भागातही पावसाने धुमाकूळ घातला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अलमट्टी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालेली दिसून येत आहे. तसेच उद्यापासून कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला उद्यापासून ओरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Rain Update)

कोल्हापूर येथील 65 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड बोळावी मार्गावरील ठाणेवाडीत दरड कोसळून मोठा दगड रस्त्यावर आला आहे. आजरा ते चंदगड कासारकांडगाव-जेऊर या गावामध्ये रस्त्याला लागून असलेल्या डोंगरावरून काही दगड घसरून खाली आलेले आहेत. अशातच आता कोल्हापूर येथील 65 बंधारे पाण्याखाली गेल्याची माहिती समोर आली आहे.

अशातच आता अलमट्टी धरणामध्ये तब्बल 80 टक्के धरणात पाणीसाठा झाला आहे. तसेच कोयना धरणामध्ये 45 टक्के पाणीसाठा आहे. कोल्हापुरमध्ये पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 29.7 फुटांवर गेली आहे. तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. (Rain Update)

रायगड जिल्ह्यातील पेण शहरात पूरजन्य परिस्थिती

रायगड जिल्ह्यातील पेण येथे मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पेण शहराच्या सखल भागात पाणी साचलं आहे. यामुळे पेणकर हे पाण्यातून रस्ता काढत जात आहेत. रायगड जिल्ह्यातील पेण, अलिबाग, महाड, मानगाव, पोलादपूर या तालुक्यांमध्ये पाणी साचलं आहे. (Rain Update)

पेण शहरात सर्वाधिक पाऊस झाला आहे. तसेच ढगफुटी देखील झाली असल्याने सर्वाधिक पाणी हे पेण शहरात साचलं आहे. यामुळे नागरिकांचे हाल होताना दिसत आहे. पेण शहरातील भोगवती नदी ही दुथडी भरुन वाहत आहे. यामुळे पेण शहराला पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. (Rain Update)

News Title – Rain Update Heavy Rain In Maharashtra Marathi News

महत्त्वाच्या बातम्या

चुकून दुसऱ्यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाले?, लगेच ‘हे’ काम करा

“किती प्रॉपर्टी घेऊन चाललीस?”; हार्दिकपासून विभक्त होताच नताशा नेटकऱ्यांकडून ट्रोल

हायकोर्टाचा राज्य सरकारला मोठा दणका; RTE प्रवेशाबाबतचा ‘तो’ अध्यादेश रद्द

लाडकी बहिण योजनेच्या नावाखाली लाडक्या भावाचा छुपा प्रचार!

‘या’ भागात पावसाचा हाहाकार; शाळेतील 120 विद्यार्थी पुराच्या पाण्यात अडकली