बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्याला वादळी पाऊस झोडपणार, ‘या’ भागाला ऑरेंज अलर्ट जारी

मुंबई | राज्यातील बहुतांश भागात रविवारी अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली. येत्या काही दिवसात राज्यात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. राज्यात आगामी 5 दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पूर्व विदर्भात जोरदार पावसाच्या इशाऱ्यासह येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  यासोबतच राज्यातीस इतर भागात वीजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई आणि ठाणेसह नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाने पुन्हा एकदा धुमाकुळ घालायला सुरूवात केली आहे. पुढचे पाच दिवस राज्याला वादळी पाऊस झोडपणार असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Tags:

पाऊस माहिती, आजचा पाऊस, हवामान उद्या पाऊस, आज पाऊस पडेल का महाराष्ट्र, पाऊस अजुन किती दिवस आहे, आज पाऊस पडणार आहे का 2022, मंगळवारी पाऊस पडेल का, आज रात्री पाऊस पडेल का,

maharashtra rain forecast, maharashtra rain news 2022, rain in maharashtra tomorrow, maharashtra rain alert, rain in maharashtra yesterday, maharashtra rainfall district wise, rainfall in maharashtra pdf, maharashtra rain news in hindi,

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More