Rain Update: पाऊस अक्षरशः धुमाकूळ घालणार!, राज्याच्या ‘या’ भागांना पावसाचा इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rain Update | आताच्या घडीला राज्यातील विविध भागांमध्ये थंडीचा कडाका असला तरी येत्या काही दिवसांत उन्हाळ्याचे दिवस येणार आहेत. उन्हाळा सुरू होताच खासकरून ग्रामीण भागातील लोकांना, शेतकऱ्यांना पावसाची आतुरता असते. यंदा राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. प्रशांत महासागरात सक्रिय असलेली एन-निनोची स्थिती या महिन्यातही राहणार असल्याचा अंदाज आहे. परंतु, फेब्रुवारी महिन्यानंतर या क्रियेत लक्षणीय बदल होईल.

फेब्रुवारीनंतर एल-निनोनची स्थिती हळूहळू कमजोर पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. एकूणच काय तर यंदा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वाढली आहे. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, प्रशांत महासागरात एल-निनोची स्थिती जैसे थे आहे. सरासरीपेक्षा तेथील पाण्याचे तापमान जास्तच आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.

पावसाची चाहूल

तसेच फेब्रुवारी महिन्यानंतर एल-निनो स्थिती हळूहळू कमजोर पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. असे झाल्यास यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हिंदी महासागरातील द्वि-धुव्रिताही सध्या सक्रिय आहे. आगामी काळात किंबहुना दोन महिन्यांतच ही स्थिती तटस्थ अवस्थेत पोहचण्याची शक्यता असल्याचेही महापात्रा यांनी सांगितले.

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यातील उन्हाळ्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण या महिन्यात देशभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज आहे. या महिन्यात भारतात सरासरी 22.7 मिमी पाऊस पडतो. पण सरासरीच्या तुलनेत यंदा 119 टक्के पावसाचा अंदाज आहे. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Rain Update यंदा पाऊस धुमाकूळ घालणार

2023 या वर्षभरात किमान तापमान सरासरीपेक्षा जास्तच राहिले. जानेवारी महिन्यात देखील किमान तापमान सरासरीपेक्षा एक ते तीन अंश सेल्सिअसने अधिक राहिले. सध्या सुरू असलेल्या फेब्रुवारी महिन्यात देखील किमान तापमान जास्त राहणार असल्याचा अंदाज आहे. कमाल तापमान देशभरात जास्त राहील. राज्यातील मुंबई आणि किनाररपट्टी वगळता कमाल तापमान सरासरी इतकेच राहण्याची शक्यता आहे.

जानेवारी 2024 मध्ये भारतात सरासरी 7.2 मिमी इतका पाऊस झाला. सर्वात कमी पाऊस म्हणून जानेवारीतील पावसाच्या आकडेवारीची नोंद करण्यात आली आहे. खरं तर 1901 ते 2024 या काळातील नवव्या क्रमांकाचा सर्वांत कमी पाऊस झाला आहे. जानेवारी महिन्यात देशभरात सरासरी 17.1 मिमी पाऊस पडत असतो.

News Title- Indian Meteorological Department has predicted the possibility of heavy rains in the state this year
महत्त्वाच्या बातम्या –

Maratha Reservation: सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही!, राज्य शासनाची विनंती मागासवर्ग आयोगाने फेटाळली!

Pune News: दरवाजाबाहेर चावी लपवून ठेवत असाल तर सावधान!, पुण्यात घडला धक्कादायक प्रकार

Chhagan Bhujbal | “छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर?, भाजपवाल्यांनो… कुठं फेडाल हे पाप?”, एका पोस्टमुळे मोठी खळबळ

‘त्या भुजबळच्या… लई माज आलाय त्याला’, आमदाराची ऑडियो क्लिप व्हायरल झाल्याने मोठी खळबळ

‘येत्या पाच वर्षात ग्रामीण भागात…’; सर्वसामान्य नागरिकांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा