पुणेकरांनो सावधान! पुढील 24 तास धोक्याचे, हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Pune Rain Update | पुणे शहरात दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुणे शहरात काल पावसाने नको नको केलं आहे. शहरांच्या रस्त्यांवर पाणी साचलं आहे. तसेच पुणे शहरासह राज्यात येत्या 24 तासात अतिमुसळधार पाऊस दाखल होणार असल्याचा अंदाज आता हवामान विभागाने वर्तवला आहे. 10 जून रोजी मुंबईमध्ये मान्सूनने दमदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आहे. अशातच आता येणारे पुढील 24 तास धोक्याचे असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.

पुणे शहरात पूरजन्य परिस्थिती

पुणे शहरात पूरजन्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल परिस्थिती पाहायला मिळत आहे. मोसमी वारे पुढे सरकत चालले आहेत. मान्सूनने आताच लातूर, पुणे, धाराशिव, नांदेड, हे जिल्हे व्यापले असून पुढील एक ते दोन दिवसांमध्ये मान्सून उर्वरित महाराष्ट्र आणि मुंबई व्यापेल, असा अंदाज आहे. (Rain Update)

पुढील दोन दिवसांमध्ये राज्यभरात पाऊस थैमान घालेल. दोन दिवसांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने लावला. तसेच राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांमध्ये धडकल्यानंतर मान्सून मराठवाड्यातील भागांमध्ये दाखल झाला आहे. अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. (Rain Update)

विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कटकडाटासह हवामान विभागाने (Rain Update) पावसाचा हाय अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने पुढील 48 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र कोल्हापूर घाटातील भाग आणि सातारा जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईतही पावसाने तुफान बॅटिंग केली आहे. त्यामुळे मुंबईच्या वाहतुकीवर परिणाम झाला. ठिकठिकाणी पाणी साचल्याने रेल्वेसेवा खोळंबली आहे. मध्य पश्चिम आणि हार्बरच्या लोकल अर्धा तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे कामावरून जाणाऱ्या चाकरमान्यांना याचा फार मोठा फटका बसला.

‘या’ जिल्ह्यांमध्ये रेड आणि येलो अलर्ट जारी

तसेच राज्यात काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. तर ठाणे, पुणे, रायगड आणि सातारा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

News Title – Rain Update Maharashtra In Heavy Rain Yellow Alert And Red Alert

महत्त्वाच्या बातम्या