Loading...

पुढचे तीन दिवस महाराष्ट्रात ‘रिमझिम गिरे सावन’; हवामान विभागाचा अंदाज

मुंबई |  महाराष्ट्रातल्या कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातही पुढचे 3 ते 4 दिवस पावसाचे असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. खासकरुन कोकणपट्ट्यातील 6 जिल्ह्यांसह पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये उद्या(बुधवार) दिवसभर पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

23 तारखेला म्हणजेच उद्या खासकरुन कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 24 ऑक्टोबरलाही मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पाऊस तर विदर्भातही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Loading...

5 तारखेला म्हणजेच शुक्रवारीही विदर्भातल्या बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये आणि कोकणात परतीच्या पावसाचा जोर राहील.

दरम्यान, आजही (मंगळवार) मुंबईच्या काही उपनगरांसह पुण्यात पावसाचा जोर पाहायला मिळाला. हा जोर उद्याही राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Loading...

‘श्रीराम समर्थ’ चित्रपटानिमित्त शंतनू मोघे यांच्याशी मारलेल्या खास गप्पा…

महत्वाच्या बातम्या-

 

Loading...

 

 

Loading...