विदर्भात पावसाचं थैमान! ‘या’ भागांतील शाळांना सुट्टी जाहीर

Rain Update | विदर्भात आज सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक भागांत पावसाचे पाणी साचले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान (Rain Update ) विभागाने आज ( 20जुलै) नागपूर,गडचिरोली, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

नागपूरमध्ये तर पावसाने थैमान घातले आहे. अनेक नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरले आहे.तसेच नाग नदीच्या संरक्षक भिंती अनेक ठिकाणी खचल्या होत्या. त्याचे डागडुजीचे काम गेल्या काही दिवसांपासून केले जात होते. मात्र, मुसळधार पावसामुळे यातून पाणी येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

नागपूरमधील शाळा-कॉलेजला सुट्टी जाहीर

पावसाचा जोर वाढल्याने नागपूरमधील शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. हा निर्णय अचानक घेण्यात आल्याने बरेच विद्यार्थी हे शाळेसाठी निघाले होते. त्यामुळे पालकांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला.  दरम्यान, नागपुरात नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन देखील प्रशासनाकडून (Rain Update ) करण्यात आले  आहे.

शहरातील नरेंद्र नगर, भांडेवाडी,शिवशक्ती नगर, पिवळी नदी, मानकापूर येथील वस्त्यांमध्ये पाणी साचले आहे. तर काही घरांतदेखील पाणी शिरले आहे. काही तासातच नागपुरात 91.3मिमी पावसाची नोंद झाली.

विदर्भातील ‘या’ भागांना ऑरेंज अलर्ट जारी

गडचिरोलीमध्ये देखील पावसाने धुमाकूळ घातला आहे. येथे कालपासून 52.0 मिमी पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात 40 पैकी 13 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा मंडळामध्ये सर्वाधिक 270.8 मिमी पावसाची नोंद झाली. त्यापैकी सिरोंचा मुख्यालयी 184 मिमी पाऊस पडला आहे.

तसेच भंडारा जिल्ह्यात देखील काल रात्रीपासून जोरदार(Rain Update ) पाऊस सुरू आहे. या पावसानं जिल्ह्यातील नदी – नाले प्रवाहित झाले आहेत. तर, काही सखल भागात पावसाचं पाणी साचलं आहे.

News Title –  Rain Update School holidays announced in Nagpur

महत्त्वाच्या बातम्या-

पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी!

‘आता लाडक्या नातवाचं बघा’; मनसे नेत्याने मुख्यमंत्र्यांना सुनावलं

‘असं कोणी मिळालं ज्याच्यासोबत मी…’; हार्दिक पांड्याचा खुलासा

चुकून दुसऱ्यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाले?, लगेच ‘हे’ काम करा

“किती प्रॉपर्टी घेऊन चाललीस?”; हार्दिकपासून विभक्त होताच नताशा नेटकऱ्यांकडून ट्रोल