मुंबई | जानेवारी महिना संपत आला तरी राज्यात काही भागांत कडाक्याची थंडी(Winter) पडली आहे. त्यातच हवामान विभागानं(Department Of Meteorology) काही जिल्ह्यांना पावसााचा इशारा दिला आहे.
औरंगाबाद, नगर जिल्ह्यांत नुकताच काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊल पडला आहे. त्यातच उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे.
शुक्रवारी राज्याच्या किमान थंडीत तापमानात वाढ होण्याची शक्यताही हवामान खात्यानं सांगितली आहे. तसेच पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यांत २९ जानेवारीपासून काही ठिकाणी थंडीचा जोर वाढू शकतो. त्यामुळं २९ जानेवारी नंतर राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. २ फेब्रुवारी पर्यंत थंडीचा जोर कायम असणार आहे, असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
थंडीचा जोर वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आल्यानंतर बळीराजा चिंतेत आला आहे. कारण गहू, कांदा या पिकांना या गारठ्याचा फटका बसू शकतो.
महत्वाच्या बातम्या-