बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खुशखबर! यंदा पाऊस वेळेवरच, 10 जूनपर्यंत पाऊस कोकणात धडकणार

मुंबई | सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी समुद्रावर आणि जमिनीवर वातावरण पोषक आहे. त्यामुळे यंदा मान्सून 1 जून रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. जूनच्या पहिल्याच आठवड्यात केरळात मान्सून दाखल होणार असल्याचं हवामान विभागानं सागितलं आहे. तर 10 जूनपर्यंत मान्सून कोकणात धडकणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.

येत्या 15 मे आणि 31 मे रोजी पावसाचा अधिकृत अंदाज वर्तवला जाणार आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. 2019 आणि 2020 या गेल्या दोन वर्षात अरबी समुद्रातील वादळामुळे महाराष्ट्रात मान्सून लांबणीवर पडला होता. मात्र यंदा पाऊस वेळेवर हजेरी लावणार आहे. त्यामुळे आता यंदा शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येणार आहेत.

येणारा पावसाळा देशभरात समाधानकारक असेल, असा अंदाज ‘स्कायमेट वेदर’ या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने वर्तवला होता. राज्यात यंदा 103% पाऊस पडण्याची शक्यता आहे. यात 5% चा फरक पडू शकतो. त्यानुसार 98% ते 107% यादरम्यान पाऊस पडेल. त्यामुळे यावर्षी देखील सरासरी इतकाच पाऊस पडेल, अशी माहिती स्कायमेट वेदरने दिली होती.

दरम्यान, भारतात पाऊस पडण्यास ‘एल निनो’ आणि ‘ला निना’ कारणीभूत ठरतात. यावेळीला ‘ला नीना’ स्थिती तटस्थ असणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळे यंदा चांगला पाऊस येऊ शकतो.

थोडक्यात बातम्या-

डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणातील ‘या’ आरोपीला जामीन मंजूर

अभिनेते दलिप ताहील यांचा मुलगा ड्रग्ज प्रकरणी अटकेत; अशी करत होता अंमली पदार्थांची मागणी

मास्क लाव सांगणं आलं अंगाशी, घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

“संजय राऊतला काय अधिकार मराठा समाजावर बोलण्याचा?”

“कोरोना परिस्थिती हाताळण्यात भारतातील राजकीय नेतृत्व अपयशी ठरलं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More