बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेतकऱ्यांची धाकधुक पुन्हा वाढणार?; हवामान विभागाचा ‘या’ भागात पावसाचा अंदाज

नवी दिल्ली | देशात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलं आहे. त्यातच आता पाऊस पुन्हा बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 26 ऑक्टोबरपासून देशाच्या काही भागात पुन्हा एकदा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढवली आहे.

ईशान्य मान्सून वारे म्हणजेच परतीच्या मान्सून वाऱ्यामुळे पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओडीसा आणि गोव्यातील काही भागात पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. याशिवाय महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातही परतीच्या पावसाची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतीतली सर्व पीकं पावसाच्या पाण्यात वाहून गेली आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. नद्या, नाल्या दुथडी भरून वाहत होते. या पूरामध्ये दुचाकी, बसच नाही तर जनावरे, माणसंदेखील वाहून गेली आहेत.

आता कुठे महाराष्ट्रातील परिस्थिती स्थिरस्थावर होत होती. अजून बऱ्याच भागात तर नुकसान भरपाई सुद्धा जाहीर करण्यात आली नाहिये. त्यातच हवामान विभागाने वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची धाकधुक पुन्हा वाढली आहे. जर महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस झाला तर पुन्हा शेतकऱ्यांना त्याच संकटाला सामोरे जावं लागणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं”

‘मी हे खपवून घेणार नाही’; क्रांती रेडकर कडाडली

ऐन दिवाळीच्या तोंडावर ST बसेस राहणार बंद?, वाचा नेमकं कारण काय?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, सर्व पुर्वनियोजित कार्यक्रम रद्द

देशात का होतेय डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या संख्येत घट?, वाचा सविस्तर

 

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More