नवी दिल्ली | अनेक राज्यात थंडी कमी झाली असून वातावरणात अनेक बदल पाहायला मिळत आहेत. थंडी गायब होताच काही राज्यांना वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपलं आहे. अचानक पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या भागात रात्री उशिरापर्यंत वादळी वाऱ्यासह हलका ते मध्य स्वरूपाचा पाऊस सुरू होता. दिल्ली, गाझियाबाद, नोएडा, हरियाणाच्या अनेक भागात हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
उत्तर भारतासह पश्चिम भारतातही 28 फेब्रुवारीपासून विजांच्या कडकडाटासह वेगवान वाऱ्याच्या हजेरीत जोरदार पावसाची शक्यता आहे. या भागात 3 मार्चपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या 2 आठवड्यापासून कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. तापमानात मोठ्या प्रमाणात चढ उतार होत असताना राज्यातील अनेक भागात किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअस पर्यंत वाढ झाली आहे.
थोडक्यात बातम्या-
“शरद पवारांना 2024ला सर्वात मोठी भेट द्यायचीये, कामाला लागा”
“हे पाकिस्तानी समर्थकांचे मंत्रिमंडळ, असे मंत्रिमंडळ महाराष्ट्रात कधीच झाले नाही”
“मुख्यमंत्र्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून संभाजीराजे यांचं उपोषण सोडवावं”
फोन टॅपिंग प्रकरणात गृहमंत्र्यांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले…
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ, राज्यपाल कोश्यारींनी दिले ‘हे’ आदेश
Comments are closed.