Top News महाराष्ट्र मुंबई

दडी मारलेला पाऊस करणार दैना; पुढील 4 दिवस ‘या’ भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता

संग्रहित फोटो

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय होण्याची शक्यता आहे. पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालं असून मुंबईसह  महाराष्ट्रातील काही भागात पुढील ४ दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे.

मुंबई शहर, उपनगरांसह, ठाणे आणि कोकणात उद्यापासून चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे, म्हणजेच १६ जुलैपर्यंत मुंबईसह रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील विविध भागांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सोमवारी दक्षिण कोकणात जोरदार तसेच अंतर्गत भागात मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर विदर्भात मंगळवारपासून जोरदार पाऊस बरसणार आहे. हवामान विभागानं यासंदर्भात अंदाज वर्तवला आहे. तर मंगळवार आणि बुधवारी मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे, मात्र जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. या महिन्यात चांगल्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

ज्योतिरादित्य शिंदेंचं सचिन पायलट यांच्यासाठी ट्विट, शिंदें म्हणतात…

हा घ्या पुरावा…RSS स्वयंसेवकांनी धारावीत काम केल्याचा- चित्रा वाघ

सचिन पायलट यांना मोठा धक्का; परतलेल्या 3 आमदारांचं धक्कादायक वक्तव्य

शरद पवारांनी एनडीएमध्ये येऊन नरेंद्र मोदींसोबत काम करावं, केंद्रीय मंत्र्याचं निमंत्रण

संजय राऊतांचं भाजपला ओपन चॅलेंज; “हिंमत असेल तर महाराष्ट्रात ‘हे’ करुन दाखवा!”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या