बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पुढील काही तासांमध्ये कोसळणार पाऊस!

मुंबई | महाराष्ट्रातील काही भागात येणाऱ्या काही तासात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अवकाळी पावसाने गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं होतं. त्यातच शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या पिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रासह कोकणात येणाऱ्या गुरूवारपर्यंत पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडणार असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस जोर धरणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काल महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह गारांचा वर्षाव झाला. त्यामध्ये गहू, कांदा इत्यादी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं.

विदर्भ तसेच मध्यप्रदेशचा सीमाभाग समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर आहे. त्या ठिकाणी चक्रीवादळाची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. कर्नाटकची किनारपट्टी ते मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र या भागात कमी दाबाचे क्षेत्र असून ते समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर एवढ्या उंचीवर आहे. त्याचबरोबर राजस्थानचा नैऋत्य भाग ते अरबी समुद्राचा ईशान्य भाग, सौराष्ट्र, कच्छ या भागात कमी दाबाचे क्षेत्र असल्याने राज्यात अवकाळी पावसाचं वातावरण बनलं असल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

पबजी गेमच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; PUBG Mobile India लवकरच भारतात लाँच होणार

परमबीर सिंह यांच्या पत्रावरुन ‘या’ केंद्रीय मंत्र्याची ठाकरे सरकारवर बोचरी टीका, म्हणाले…

लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर…; हर्ष गोयंका यांचा व्हिडिओ होतोय व्हायरल, पाहा व्हिडिओ

…तर एवढ्या दिवस ते गप्प का बसले?- रूपाली चाकणकर

कोरोनाची भीती दाखवून सरकार दहशत माजवतंय- बंडातात्या कराडकर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More