बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्राला पावसाने झोडपलं, सुप्रिया सुळेंची केंद्राकडे मदतीची मागणी

नवी दिल्ली | गेल्या तीन-चार दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार पाऊस पडत आहे. एकिकडे कोल्हापूर, सांगली, चिपळून, महाड या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे सातारा, भोर, रायगड, रत्नागिरी येथील बऱ्याच ठिकाणी दरड कोसळल्यानं कित्येक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. महाराष्ट्राला या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केेंद्राने मदत करावी म्हणून भाजप खासदार सुप्रिया सुळे यांनी आज गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे.

यावेळी सुप्रिया सुळे यांच्यासह शिवसेना खासदार अनिल देसाई आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी या देखील उपस्थित होत्या. या तिन्ही खासदारांनी शहांना भेटत त्यांना महाराष्ट्रावर सध्या पावसामुळे ओढावलेल्या संकटाची माहिती दिली. तसेच महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी दरड कोसळल्यानं झालेल्या दुर्घटनांबद्दल देखील माहिती देत केंद्राकडे मदतीची मागणी केली.

केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत केली जाईल, असं आश्वासन अमित शहांनी दिल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे.  सुप्रिया सुळेंनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे. तसेच या ट्वीटमध्ये सुप्रिया सुळेंनी अमित शहांचे आभार देखील मानले आहेत.

दरम्यान,राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून परिस्थिती भीषण होत चालली आहे. राज्य सरकार, प्रशासन, समाजसेवी संस्था यांच्यासह अनेक स्वयंसेवक पूरग्रस्त भागात मदतीसाठी धावत आहेत.

थोडक्यात बातम्या –

“अतिवृष्टीग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करा”

सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ, लवकरच 50 हजारापार जाण्याची शक्यता

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

नागरिकांनो सावधान! देशात पुन्हा कोरोनाचा फैलाव वाढतोय

‘टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान भारताला हरवणार’; शोएब अख्तर पुन्हा बरळला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More