बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रात पावसाचं रौद्र रुप! वरंध्याच्या घाटात गेल्या 24 तासांत 30 ठिकाणी दरडी कोसळल्या

भोर | सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान घातलं आहे. महाराष्ट्रात पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर बऱ्याच ठिकाणी दरडी कोसळल्या आहे. भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस चालू आहे. गेल्या 24 तासांत वरंधा घाटात तब्बल  30 ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत.

वरंधा घाटात दरड कोसळणे चालूच असल्याने घाटातील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे. काल सकाळपासून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी दरड हटविण्याचं काम करत आहेत. चार जेसेबींच्या साहाय्याने हे काम चालू आहे. दरड हटविण्यासाठी  8  दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागू शकतो, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

वरंधा घाटातील शिरगाव येथे 2 ठिकाणी, वाघजाई मंदिरापाशी 2 ठिकाणी, आशिंपी येथे 2 ठिकाणी, शिर्डोशी येथे 5 ठिकाणी, वारवंड येथे 4 ठिकाणी, पऱ्हर खुर्द येथे 4 ठिकाणी आणि कुडली खुर्द, कुडली बुद्रुक, कंकवाडी, दापकेघर येथे प्रत्येकी 2 ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. या घाटात अजून देखील दरडी कोसळण्याचं सत्र चालूच आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात पावसाने अक्षरश: हाहाकार माजवला आहे. काल रात्री रायगडमध्ये पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. महाड तालुक्यातील तळई गावात दरड कोसळून 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

“…अन्यथा मुंबईकर जनताच 2 ऑगस्टपासून सविनय नियमभंग आंदोलन करेल”

“यांना लाजा वाटत नाही का?, एवढी मोठी दुर्घटना घडली तरी एक अधिकारी घटनास्थळी नाही”

राजकीय व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे प्रसिद्ध ZP शाळा वाबळेवाडीच्या शिक्षकांचे राजीनामे

“संवेदनाहीन, निबर राज्यकर्ते महाराष्ट्राला लाभणं हे राज्याचं दुर्दैव”

‘ती व्यक्ती दुसरी कोणी नसून मी होते’; शर्लिन चोप्राचा खळबळजनक खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More