बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | अरबी समुद्रात (Arabian Sea ) निर्माण झालेल्या चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीमुळे राज्यात पुन्हा पावसाची परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे राज्यात 3 दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार राज्यात कालपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच आजपासून पावसाचा जोर अजून वाढण्याची शक्यता असल्याचंही हवामान विभागाने सांगितलं आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.त्यामुळे प्रशासनाने राज्यातील 17 हून अधिक जिल्ह्यांना हाय  अलर्ट जारी केला आहे. त्यापैकी पालघर, नाशिक, धुळे आणि नंदूरबार या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट बजावण्यात आला आहे. ऑरेंज अलर्ट जारी केलेल्या जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह तीव्र पावसाची शक्यता आहे.

जळगाव, औरगांबाद, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, ठाणे, मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि सातारा जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये तुरळक मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाय पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

दरम्यान, हवामान विभागाने 3 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार राज्यात कालपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे जनजीवन मात्र विस्कळीत झालं आहे. त्यातच पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरीकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

ओमिक्रॉनचा प्रसार आणखी वाढणार?; WHO ने दिलेल्या माहितीने जगाचं टेंशन वाढलं

चिंताजनक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा आकडेवारी

ATMमधून पैसे काढताय! मग जाणून घ्या ‘ही’ नवीन नियमावली

मोठी बातमी! उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात

kunal Kamra म्हणतो, “मी एक कोरोना व्हायरस आहे म्हणून…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More