बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पावसाचं रौद्ररूप! कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सातारा | गेल्या आठवड्याभरापासून पावसानं चांगलाच जोर धरलेला पहायला मिळतोय. त्यामुळे हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा दिला जातोय. तर गेल्या काही दिवसापासून साताऱ्यात मोठ्या प्रमाणावर पावसाने हजेरी लावली आहे. अशातच आता मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे कोयना धरणाच्या पाण्याचा अवाक वाढला आहे. त्यामुळे आता धरणातील पाण्याची आवक वाढल्यानं धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फुटानं उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ झाली आहे. धरणाची वाढत जाणारी जलपातळी नियंत्रणात आणण्यासाठी आता धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फुटाने उचलून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोयना धरणातील पाणीसाठा सध्या 103.19 टीएमसीवर पोहचला आहे.

कोयना धरणातून नदीपात्रात एकूण 10,000 क्युसेक पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसाचे आगर असणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने रौद्ररूप धारण केले आहे. त्यामुळे शेतीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पहायला मिळतंय.

दरम्यान, कोयना धरणाशेजारील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना धरणामुळे नदीच्या पातळीतही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी जास्त सतर्क राहण्याची गरज आहे. तर कराड आणि सांगलीकरांना देखील सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या –  

राजस्थानची चिंता मिटली! आयपीएलआधी ‘या’ नव्या खेळाडूची तुफान खेळी

‘महिलांच्याबाबतीत सरकार असंवेदनशील’; राष्ट्रीय महिला आयोगाने ठाकरे सरकारला फटकारलं

‘तिचीच चूक असणार’; हेमांगी कवीची मन हेलावून टाकणारी पोस्ट

बेरोजगार युवकांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय!

“हवेत गोळीबार करू नका, चंद्रकांत पाटलांना अफवा पसरवण्याची सवय”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More