नवी दिल्ली | कोरोनाबाधितांच्या (Corona) संख्येत चढ-उतार पाहायला मिळत असताना मंकीपॉक्सच्या (Monkeypox) वाढत्या केसेसने जगाचं टेंशन वाढवलं आहे. मंकीपॉक्स व्हायरसची वाढती दहशत बघता केंद्र सरकारने (Central Goverment) मोठं पाऊल उचललं आहे.
जगभरातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्स व्हायरसची लागणं झालेले रूग्ण आढळून येत आहेत. भारतात मंकीपॉक्सचा एकही रूग्ण आढळला नसला तरी केंद्र सरकारने सतर्कतेची पावलं उचलायला सुरूवात केली आहे.
केंद्र सरकारने मंकीपॉक्स व्हायरसची गांभीर्याने दखल घेतली आहे. केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानतळं, बंदरं आणि देशांच्या सीमांवर लक्ष ठेवायला सुरूवात केली आहे. तसेच केंद्राने राज्यांना पत्र लिहून सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर कोणाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला तर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू (Contact Tracing) केलं जाईल, असा इशारा सरकारने दिला आहे.
दरम्यान, या व्हायरसची लागण झालेल्या रूग्णात ताप आलेल्या व्यक्तिंप्रमाणे सामान्य लक्षणं दिसतात. तसेच या रूग्णाच्या संपूर्ण शरीरावर व चेहऱ्यावर पुरळ दिसतात. ताप, थंडी वाजून येणे, स्नायू व डोकेदुखी, थकवा ही देखील मंकीपॉक्सची लक्षणं आहेत.
थोडक्यात बातम्या-
“पाहुण्यांना दुसऱ्या रस्त्याने घेऊन जात बारामतीचा विकास झाला”
“…तर संभाजीराजे छत्रपतींना संजय राऊतांची सेफ जागा द्या”
नवनीत राणांचा मुंबई पोलिसांना थेट इशारा, म्हणाल्या…
संभाजीराजेंना पाठींबा देण्याबाबत संजय राऊत स्पष्टच बोलले, म्हणतात…
Weather Update | पुढील 5 दिवस ‘या’ भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
Comments are closed.