Top News महाराष्ट्र मुंबई

सरकारनं सुरक्षा काढली; मनसेनं स्थापन केलं स्वतःचं सुरक्षा पथक!

मुंबई | राज्य सरकारने विरोधी पक्ष भाजप आणि इतर राजकीय नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेनं स्वतःचं सुरक्षा पथक स्थापन केलं आहे.

मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांनी राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी मनसेच्या महाराष्ट्र रक्षक पथकाची स्थापना केली आहे. महाराष्ट्र रक्षक नावाने टी-शर्ट छापून मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरे यांना संरक्षण देणार आहेत.

सरकारच्या निर्णयाचा सरचिटणीस नयन कदम यांनी जोरदार विरोध करत आम्ही महाराष्ट्र सैनिक राजसाहेबांच्या सुरक्षेसाठी सदैव जागरूक असल्याचं  म्हटलं आहे.

दरम्यान, मनसेचे कार्यकर्तेच राज ठाकरेंचे खरं संरक्षण असल्याचं मनसे नेत्या रूपाली पाटील- ठोंबरे यांनी म्हटलं होतं. राज ठाकरे यावर काय बोलतात याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

थोडक्यात बातम्या-

त्यांनी मुख्य हायवेने न जाता शाॅर्टकट घेतला आणि तिथंच घात झाला!

कौतुकास्पद! चौथीपर्यंत शिकलेल्या आजोबांनी तयार केली 4 भाषांमध्ये डिक्शनर

भंडारा आग प्रकरण; त्यानं जीवाची बाजी लावली नसती तर आणखी मोठा अनर्थ…

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांबाबत ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

…अन् इंदोरीकर महाराज ढसाढसा रडले; पाहा व्हिडीओ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या