बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज कुंद्राने लॅाकडाऊनमध्ये फक्त पाचच महिन्यात कमावले ‘एवढे’ कोटी रुपये!

मुंबई |   अश्लील व्हिडिओ प्रकरणात अडकलेल्या राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 19 जुलै रोजी त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. राज कुंद्राच्या अ‍ॅप बिझनेसमधून मिळणाऱ्या रकमेबाबत अनेक अहवाल समोर आले आहेत.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिल्पा शेट्टीच्या पतीने लॉकडाऊन दरम्यान त्याच्या हॉटशॉट्स या अॅपला ग्राहकांनी केलेल्या सबस्क्राईबमधून 1.17 कोटी रुपये मिळवले. त्याची ही कमाई ऑगस्ट ते डिसेंबर 2020 पर्यंत आहे. ही कमाई अ‍ॅपल स्टोअरची असल्याचं पोलिसांनी सांगितले. तर गुगल पेच्या माध्यमातून मोबाइल फोन अॅपची कमाई अद्याप निश्चित केलेली नाही. पोलिसांचा असा अंदाज आहे की, राज कुंद्राने प्ले स्टोअर वरून बरेच पैसे मिळवले असतील कारण अँड्रॉइड फोनचे वापरकर्ते बरेच आहेत.

राज कुंद्राच्या घरातून मोठ्या प्रमाणात डेटा हस्तगत करण्यात आल्याचा दावाही मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने केला आहे. पोलिसांनी अनेक इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि स्टोरेज साधने जप्त केल्याची माहिती समजत आहे.

दरम्यान, 2023 पर्यंत त्याचं 34 कोटी रुपये मिळण्याचं लक्ष्य होतं. गेल्या वर्षी 5 महिन्यांत त्याने 1.17 कोटी रुपये कमावले असल्याचं समजतंय. राज कुंद्राचा अ‍ॅप फक्त पेड ग्राहकांसाठी होता. त्यात अश्लील कंटेंट दाखवला जात होता. त्यावरील व्हिडिओ मुंबईच्या आसपासच्या भागात चित्रित करण्यात आले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“भाजप आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला”

धक्कादायक! पतीसोबत दुचाकीवरून जात असताना अभिनेत्रीचा मृत्यू

काळजाचा ठोका चुकवणारी घटना!; विहिरीत पडलेल्या सासूला वाचवण्यासाठी सुनेनं…

पीव्ही सिंधूकडून पदकाची आशा कायम; प्री- क्वाॅर्टर फायनलमध्ये धडक

‘आता माघार नाहीच’; शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह 14 पक्ष एकवटले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More