बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अश्लील व्हिडीओप्रकरणी अखेर राज कुंद्रानं दिलं स्पष्टीकरण, म्हणाला…

मुंबई | गेल्या महिन्यात राज कुंद्रा (Raj Kundra) प्रकरण चांगलंच तापलेलं पहायला मिळालं. अश्लील व्हिडीओ बनवणे (Porn Video) आणि अपलोड करणे याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि उद्योजक राज कुंद्राला अटक करण्यात आली होती. यानंतर याप्रकरणी अनेक खुलासे होत अनेक गोष्टी समोर आल्या. अखेर याप्रकरणी आता राज कुंद्रानं मौन सोडलं आहे.

राज कुंद्रा यांनी एक निवेदन जारी करत आपलं मौन सोडलं आहे. घडलेल्या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसून आयुष्यात आपण कधीही पॉर्नोग्राफी निर्मितीमध्ये किंवा वितरणात सहभागी झालो नसल्याचं राज यांनी निवेदनात म्हटलं आहे.

घडलेला सगळा प्रकार मला बदनाम करण्याचा आहे. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे. न्यायालयात सत्याचा विजय होईल. मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे  माध्यमांनी आणि माझ्या कुटुंबाने मला आधीच दोषी ठरवलं. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा मला मनस्ताप होत आहे.

दरम्यान, राज कुंद्राच्या अटकेनंतर त्याच्या आणि शिल्पा शेट्टीच्या कुटुंबियांच्या अडचणींत वाढ झाली. राजच्या अटकेनंतर मीडियाचाही खूप प्रभाव त्यांच्या वैयक्तिक जीवनावर पडलेला पाहायला मिळाला.

थोडक्यात बातम्या – 

“2014 ला शिवसेनेला दूर करा असं भाजप नेत्यांना खासगीत सांगणारे कोण होते?”

धक्कादायक! अभिनेत्री ऐश्वर्या रायला ईडीचा समन्स, ‘या’ प्रकरणात नाव आलं समोर

“2 महिन्यांपासून कुठेय पठ्ठ्या…”रावसाहेब दानवेंची जीभ पुन्हा घसरली

‘बाजारू अमोल मिटकरी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तळवे चाटून झाले असेल तर…’; राम सातपुतेंचा हल्लाबोल

लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, आता मिळणार ‘ही’ मोफत सुविधा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More