बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सचिन वाझे प्रकरणामुळे वाचला होता राज कुंद्रा; जाणून घ्या वाघे-कुंद्रा केस कनेक्शन!

मुंबई | प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पॉर्न फिल्म बनवणं आणि त्या ऑनलाईन प्रदर्शित करणं हा आरोप करण्यात आला आहे. कुंद्राला अटक केल्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला अटक करण्याची तयारी केव्हाचं केली होती. मात्र सचिन वाझे केसमुळे तो वाचला होता.

मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला अटक करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यातच तयारी केली होती. त्या केससंदर्भातचे पुरावेदेखीलही त्यांनी जमा केले होते. परंतू अँटेलिया घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती. त्यामुळे मुंबई पोलीस त्या केसकडे पुर्णपणे वळले त्यामुळे सर्व पुरावे साक्षीदार असतानाही पाच महिने राज कुंद्राला अटक होण्याचा कालावधी लागला. राजविरोधात तक्रार दाखल झाल्या होत्या मॉडेल्सना काम देण्याचं लालच दाखवून त्यांना या इंडस्ट्रीत आणल जायचं, असं मुंबई पोलिसांचे सहआयुक्त मिलिंद भराम्बे यांनी सांगितलं.

फेब्रुवारी महिन्यातच त्या प्रकरणाचा तपास सुरू झाला होता. लोकांचे जबाबही घेण्यात आले होते. त्यानंतर तपासात समोर आलं की छोट्या कलाकारांना शॉर्ट फिल्म्स, वेब सीरिज देण्याचं काम करण्याचं लालच दिलं जात होतं.

दरम्यान, काम देण्याच्या बहाण्याने त्यांना ऑडिशनवेळी बोल्ड सीन्स द्यायला लावायचे. आधी सेमीन्यूड फोटोशूट आणि त्यानंतर पूर्ण नूड अशा पद्धतीने शूट केलं जात होतं. त्यामुळे सचिन वाझे प्रकरण बाहेर आलं नसतं तर याआधीच राज कुंद्राला अटक झाली असती.

थोडक्यात बातम्या- 

‘दोन डोस घेतलेल्यांना बाहेर पडू द्या’; अजित पवार मुख्यमंंत्र्यांशी करणार चर्चा

जितेंद्र आव्हाडांच्या पाच कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

बोल्ड चित्रपटांची तुलना पॉर्नशी करू नका, राजने मला…’; राज कुंद्राच्या अटकेनंतर गहनाची प्रतिक्रिया

मुलगी 3 महिन्यांपासून बेपत्ता, पोलिसांची उडवाउडवीची उत्तरं; बापानं घेतला गळफास!

‘आधी आरक्षण द्या, मग आम्हाला शिकवा’; संजय राऊतांचा दानवेंवर पलटवार

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More