बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज कुंद्राची अटक बेकायदेशीर?; न्यायालयात दाखल 2 याचिकांवर आज होणार सुनावणी

मुंबई | पाॅर्नोग्राफी कंटेंट बनवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अटकेत असलेला बाॅलिवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्येगपती राज कुंद्रा याची अटक बेकायदेशिर असल्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. तसेच याबाबत आज न्यायालयात सुनावणी होणार आहे.

दरम्यान, राज कुंद्रा याचा अश्लिल चित्रपट बनवण्यामध्ये सहभाग होता. तसेच त्याच्या घरी मुंबई पोलिसांनी मारलेल्या छाप्यात बऱ्याच महत्वाच्या आणि या केसशी संबंधित पुरावे त्यांच्या हाती लागल्याचं बोललं जात आहे. त्यातच राज कुंद्रा याने फेब्रुवारीमध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आपला मोबाईल बदलल्याने आता पोलिसांना जुना डेटा मिळवणं अवघड झालं आहे.

राज कुंद्राची पोलिस कोठडी आज संपणार असून गुन्हे शाखेकडुन त्याच्या कोठडीत वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळत आहेत. तसेच गुन्हे शाखेने कोणतीही नोटीस न देता अटक केल्याने ही अटक बेकायदेशिर असल्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

राज कुंद्रा व रेयान यांनी करण्यात आलेल्या अटकेपुर्वी 41-A ही नोटीस द्यायला हवी होती. परंतु, पोलिसांकडुन ही नोटीस न देता अटक करण्यात आल्याने ही अटक कायदेशिर नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. तसेच या याचिकेवर सुनावणी होणार असून यावर न्यायालय नेमका काय निर्णय देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

कर्जबुडव्या विजय माल्ल्याला ब्रिटिश कोर्टाचा दणका!

खासदार सुजय विखे पाटील यांना मोठा धक्का; ठाकरे सरकारची ‘ही’ मोठी कारवाई

पुरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ मोठे निर्देश

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याबद्दल केंद्रीय पेट्रोलियम मंत्री म्हणतात…

चिंताजनक! लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाही होतोय कोरोना संसर्ग

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More