बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज कुंद्राची एडल्ट कंटेटबाबतची ‘ती’ व्हॉट्सअ‍ॅप चाट लीक!

मुंबई |  बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि नामांकित उद्योजक राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पॉर्न फिल्म बनवणे आणि त्या ऑनलाईन प्रदर्शित करणे हा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाबाबत रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. अशातच राज कुंद्रा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा अॅडमिन असलेल्या ग्रुपमधील चाट लीक झाली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर एच अकाउंट नावाचा ग्रुप चालवला जात असल्याच्या बातम्या आल्या आहेत. राज कुंद्रा त्या ग्रुपचा अॅडमिन आहे.  4 लोक त्याचे सदस्य होते. या  ग्रुपमध्ये मॉडेल्स, पेमेंट्स आणि रिवेन्यू याबद्दल  बोलतात. अशातच आता काही नवीन व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स देखील समोर आल्या आहेत.

लीक झालेली ही चाट 10 नोव्हेंबर 2020 ची असून त्यामध्ये एक लेख शेअर केला आहे. या लेखानुसार, 7 ओटीटी प्लॅटफॉर्मवर अश्लील सामग्री दाखवण्यसाठी समन्स बजावलं आहे. यावर उत्तर येतं की, ‘थँक्स गॉड यू प्लॅन्ड बीएफ’. त्यानंतर राज कुंद्रा म्हणतो की, सध्या काही दिवस ओटीटी प्लॅटफॉर्मवरून अत्यंत बोल्ड सामग्री  काढून टाका. आपल्याला हॉटशॉट चालू ठेवण्यासाठी मार्ग शोधायला हवा. आपल्याला एचएस ठेवण्याचा एक मार्ग शोधायचा आहे.

दरम्यान, राज कुंद्राच्या टीममधील व्यक्तीचे म्हणणं आहे की, मला शंका आहे की ते (पोलीस) अल्ट बालाजी यांना खाली उतरवण्यात सक्षम होतील. यावर राज कुंद्रा म्हणतो की ते इतके गंभीर नाहीत, त्यांना फक्त आक्षेपार्ह सामग्री काढायची आहे. आपलं आयुष्य चांगलं चाललं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही”

…म्हणून मी फडणवीसांना माझा नेता मानत नाही; पंकजा मुंडेंचं पुन्हा स्पष्टीकरण

“अहो संजय राऊत… निर्लज्जपणालाही काही मर्यादा असतात”

सामना हारल्यानंतर श्रीलंकेच्या प्रशिक्षक आणि कर्णधारामध्ये भांडण??; पाहा व्हिडीओ

तलवारीने सपासप वार झालेल्या पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलमालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More